एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासंदर्भात आता भाजप आमदारांची बैठक
राज्यातील मराठा आंदोलनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलावीत, यासाठी आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
![मराठा आरक्षणासंदर्भात आता भाजप आमदारांची बैठक Maratha Reservation issue: CM to meet all BJP Mla's tomorrow in Mumbai to take statewide review of Maratha Andolan मराठा आरक्षणासंदर्भात आता भाजप आमदारांची बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/16191547/Latur-CM-Devendra-Fadanvis-Helicoptor-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेपाठोपाठ आता भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बैठक बोलावली आहे. भाजपच्या सर्व आमदारांची मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे.
उद्या म्हणजे गुरुवारी दोन ऑगस्ट रोजी मुंबईत दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे.
राज्यातील मराठा आंदोलनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलावीत, यासाठी आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.
शिवसेनेची बैठक
दरम्यान, भाजपच्या या बैठकीपूर्वी शिवसेनेचीही बैठक झाली. 30 जुलैला झालेल्या बैठकीत शिवसेनेने तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली होती.
मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता, तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना आमदारांसोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
दरम्यान, 30 जुलैला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही स्वतंत्र बैठका झाल्या होत्या. काँग्रेसने सामूदायिक राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यपालांची भेट घेत आरक्षण देण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या
मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे
मराठा आरक्षण आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)