एक्स्प्लोर

मुंबईत आझाद मैदानातील मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली; गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन सुरुच

मुंबईत आझाद मैदानातील एका मराठा आंदोलकाला भोवळ आली. गेल्या 34 दिवसांनंतरही सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे.

मुंबई : शहरातील आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकाची प्रकृती खालावलीय. इथं एका आंदोलक तरुणाला भोवळ आलीय. गेल्या 34 दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करतायत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरु केलाय. मात्र, या आंदोलकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय. आझाद मैदानावरील मराठा आंदोलक गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि सध्या या आंदोलकांनी अन्नत्याग सुरू केला आहे. याच आंदोलनादरम्यान एका युवकाला आज सकाळी भोवळ आली. मराठा आरक्षणाची धार तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलय. मुंबईतील आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांचा दावा मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम : अशोक चव्हाण मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्याकडून आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या बैठकीला एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचीही हजेरी होती. येत्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगानं बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कुठल्याही त्रुटी राहता कामा नयेत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या मुलांना काही झालं तर याचं पाप या सरकारवर असेल : प्रविण दरेकर गेल्या 34 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदान येथे उन्हातान्हात आंदोलन करत आहेत. मी स्वतः आझाद मैदान येथे जाऊन या तरुणांची भेट घेतली. या सरकारच्या उपसमितीच्या बैठकीलाही मी हजर होतो. मात्र, या सरकारकडून बैठकांची नाटकं सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. उद्या या तरुणांना काही झालं तर याचं पाप या सरकारवर येईल. तत्काळ शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे मी या सरकारला निर्णय विनंती करतो, की या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुणांना न्याय. Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम : अशोक चव्हाण

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
BMC OC Abhay Scheme : मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Embed widget