एक्स्प्लोर
लोकलमध्ये गर्दुल्ल्याचा किळसवाणा प्रकार, गुटखा खाऊन मुलीच्या अंगावर थुंकला
शुक्रवारी रात्री 10.50 वाशी स्थानकातून पनवेलकडे जाणारी लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन अक्षरशः तिच्या अंगावर थुंकला. यावेळी तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो गर्दुला पळून गेला. याबाबत तिने फेसबुक पोस्ट लिहीत एक व्हिडीओ ही शेअर केला आहे.

मुंबई : घाटकोपरमधील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच लोकलमधील या गर्दुल्यांचा अत्यंत किळसवाणा अनुभव नेरुळ येथील रुणाली पाटील या मुलीला आहे. शुक्रवारी रात्री 10.50 वाशी स्थानकातून पनवेलकडे जाणारी लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन अक्षरशः तिच्या अंगावर थुंकला. यावेळी तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो गर्दुला पळून गेला. याबाबत तिने फेसबुक पोस्ट लिहीत एक व्हिडीओ ही शेअर केला आहे. या गर्दुल्ल्याने रुणालीच्या पाठीमागून येत अंगावर गुटखा थुंकला. यानंतर तो वाशीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला. रुणाली दुसऱ्या लोकलमधून सानपाडा स्टेशनला पोहोचली. त्यावेळी तो गर्दुल्ला चढला असलेली लोकलदेखील सानपाडा स्टेशनला आली होती. त्यावेळी रुणालीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा असे सांगितले. काही लोकांनी गर्दुल्ल्याला पकडून मारहाण देखील केली. मात्र तो त्यांच्या कचाट्यातून निसटला, असे रुणालीने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. आज माझ्यासोबत घाणेरडा प्रकार घडला. उद्या तुमच्या आई बहिणीसोबत असं घडू नये असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडीओ शेअर करा. आवाज उठवायला हवा नाही तर स्त्री माता नाही कचऱ्याची पेटी होईल, असे तिने फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे. अशा विकृत माणसांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे, असेही तिने म्हटले आहे.
आणखी वाचा























