एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना मनोहर जोशी गहिवरले

संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ज्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत, त्यात त्यांना यश मिळो, इतकीच आमची प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना आहे, असं सांगताना मनोहर जोशी यांना अश्रू अनावर झाले.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येला रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी भावूक झाले. तर, मताचं राजकारण बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ, असं वक्तव्य भाजपसोबत युतीबाबत बोलताना मनोहर जोशींनी केलं. 'आज कोणतीही राजकीय चर्चा नव्हती. मी 1992 मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मला निरोप देण्यासाठी सेनाभवनला आले होते. आमचं विमान अयोध्येला न थांबता कोलकात्याला गेलं होतं. मी पुन्हा अयोध्येला आलो, मात्र तोपर्यंत अयोध्येची तारीख उलटून गेली होती. त्यामुळे आम्हाला जाता आलं नव्हतं, आमचं अपुरं राहिलेलं कार्य आज उद्धव ठाकरे पूर्ण करायला गेले आहेत, त्यांना शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी मातोश्रीवर आलो होतो' अशी आठवण सांगताना मनोहर जोशींना गहिवरुन आलं. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ज्या कार्यासाठी बाहेर पडले आहेत, त्यात त्यांना यश मिळो, इतकीच आमची प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना आहे, असं सांगतानाही मनोहर जोशी यांना अश्रू अनावर झाले. मनोहर जोशी यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिली. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही आहेत.ठाकरे कुटुंबातून उत्तर भारतामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोनवेळा गेले होते. एकदा कोर्टाच्या कामासाठी तर दुसऱ्यांदा 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या लग्नासाठी ते उत्तर प्रदेशात गेले होते. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना मनोहर जोशी गहिवरले हिंदुत्व हे कधीच मारक ठरत नाही, हिंदुत्व हे यशाकडेच जातं. निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळेल, अशी खात्रीही मनोहर जोशींनी व्यक्त केली. आजकाल निवडणुका होतात, तेव्हा जशी हवा असते, त्यानुसार मतदान होतं. आमचा तो उद्देश नाही, हिंदू एकत्र यावेत, हिंदुत्व वाढावं आणि हिंदुस्थान हे नाव सार्थ व्हावं, हे आपलं उद्दिष्ट असल्याचंही जोशी म्हणाले. अयोध्या वारीनंतर मतदारांचं परिवर्तन होईल, असा विश्वासही मनोहर जोशींना वाटतो. हिंदू एकत्र यावे ही आमची भूमिका आहे, राजकारण नव्हे. भाजप जर हिंदुत्ववादी पक्ष असेल आणि प्रचारासाठी हा मुद्दा घेणार असेल, तर आम्ही पुन्हा एकत्र काम करु, असे संकेतही मनोहर जोशींनी दिले. मतांच्या राजकारणासाठी ज्यांच्या विरोधात बोलायचं त्यांच्या गळ्यात गळा घालायचा, हे आम्हाला मुळीच पसंत नाही, शिवसेना जे बोलते तेच करुन दाखवते, असंही मनोहर जोशी म्हणाले. पाहा संपूर्ण मुलाखत :

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget