एक्स्प्लोर

लग्नाचा तगादा लावला, प्रियकराकडून विधवेची हत्या

मानखुर्दमधील ज्योतिर्लिंग नगर परिसरातून गेले दोन महिने बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय रोहिणी अभिजित घोरपडे या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : मानखुर्दमधील ज्योतिर्लिंग नगर परिसरातून गेले दोन महिने बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय रोहिणी अभिजित घोरपडे या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. महिलेने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिच्या प्रियकराने त्याच्या दोन मित्रांच्या सहाय्याने रोहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी या महिलेचा प्रियकर सुनील रामा शिर्के याच्यासह त्याचा मित्र रामचंद्र तुकाराम जाधव आणि विजयसिंह भास्कर मोरे या तिघांना अटक केली आहे. रोहिणी या वाशी महानगरपालिका रुग्णालयात कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचा रेल्वे अपघतात मृत्यू झाला होता. त्यांना एक 9 वर्षाचा मुलगा देखील आहे. रोहिणी या 14 नोव्हेंबर रोजी मैत्रिणीच्या लग्नाला जातो असे सांगून घरुन निघाल्या. परंतु त्यानंतर त्या परतल्याच नाहीत. यावर 16 नोव्हेंबर रोजी त्यांचे भाऊ राजेंद्र मोहिते यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात त्या हरविल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी मानखुर्द पोलीस तपास करीत असताना त्यांना रोहिणीचे ती ज्या रुग्णालयात काम करते, तिथे काम करणाऱ्या आणि रोहिणीला कंत्राटी कामावर लावणाऱ्या सुनील शिर्के याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. याचबरोबर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी रोहिणी यांच्या बँक खात्यातून 65 हजार रुपये वाशी आणि कोपरखैराणे येथून काढल्याचे पोलिसांना समजले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता सुनीलचा मित्र राम जाधव याने हे पैसे काढल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावर रामने सांगितले की, त्यांनी या महिलेला सुनीलच्या मूळ गावी रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील शिरसाड येथे नेले. तिथे नेऊन विजयसिंह मोरे या मित्राची मदत घेऊन तिची हत्या केल्याचे सांगितले. या नराधमांनी रोहिणीच्या डोक्यात फावड्याचा लाकडी दांडा मारून आणि नंतर तिच्याच साडीने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोन दिवस अगोदरच यासाठी सुनीलने एका पडीक जागी खड्डा खोदून ठेवला होता. या खड्ड्यात तिला मीठ टाकून पुरले. त्यानंतर सुनीलने रोहिणीचे एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड रामला देऊन त्याला सर्व पैसे काढून घेण्यास सांगितले. या सर्व अपराधाची आरोपींनी कबुली दिली आहे. सुनील आणि रोहिणीचे प्रेमसंबंध होते. गेले काही दिवस रोहिणी सुनीलकडे लग्नाचा आग्रह करीत होती. सुनील विवाहित होता, त्यालाही दोन मुले आहेत. या प्रेम प्रकरणाची माहिती त्याच्या घरच्यांना झाली आणि त्याच्या घरीदेखील वाद सुरु झाले. त्यामुळे सुनीलने रोहिणीच्या हत्येचा कट रचला आणि यातून हे हत्याकांड घडले.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
Embed widget