एक्स्प्लोर

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी आरोपी महिला जेल अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून संधी

भायखळा महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे.

मुंबई : मंजुळा शेट्ये प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 17 जूनपर्यंत तहकूब केली आहे. या आरोपींना अटक होऊन जवळपास दोन वर्ष उलटून गेली आणि खटला सुरु होऊन जवळपास पाच महिने उलटून गेलेत तरी आतापर्यंत या खटल्यातील केवळ एकच साक्षीदार तपासून झाला आहे. त्यामुळे आरोपींना काहीतरी दिलासा मिळायला हवा, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला. यावर सरकारी वकिलांनी हायकोर्टाला कळवलं की येत्या काळात लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी याचिकाकर्त्यांना सूचना केली की, "तुम्ही हा जामीन अर्ज मागे घ्या, मी खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला देतो. अथवा या जामीन अर्जाची गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घेऊ" मात्र याचिकाकर्त्यांनी पुढील सुनावणीपर्यंत सत्र न्यायालयातील खटल्याची प्रगती पाहू, अशी विनंती हायकोर्टाकडे केलेली आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीत हायकोर्ट काय निर्णय देतं, यावर या खटल्याचं आणि आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीचं भवितव्य अवलंबून आहे. भायखळा महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. 24 जून 2017 रोजी मंजुळा शेट्येला भायखळा कारागृहातील या महिला अधिकाऱ्यांनी किरकोळ कारणांवरुन आमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी या सहा महिला अधिकारी अटकेत असून यांच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मंजुळा शेट्ये या जेल वॉर्डनकडून काही अंडी आणि पावांचा हिशेब न लागल्याने तिला नग्न करुन अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. ज्यात तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न जेल प्रशासनाने केला होता. मात्र कारागृहातील कैद्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी

व्हिडीओ

Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
Embed widget