एक्स्प्लोर
मुंबई स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकरांचा पत्ता कट
मुंबई : मुंबई स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले मंगेश सातमकर यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला असून, शिवसेनेने रमेश कोरगावकर यांना संधी दिली आहे.
हा ट्विस्ट शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीतही पाहायला मिळाला. इथे शीतल म्हात्रे यांचा पत्ता कट करुन शुभदा गुडेकर यांना संधी देण्यात आली आहे.
रमेश कोरगावकर यांनी आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी तर शुभदा गुडेकर यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. 14 मार्चला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड होईल.
दरम्यान, संधी न मिळाल्यामुळे रमेश सातमकर नाराज असल्याचं समजतं. मात्र पक्षप्रमुख जो आदेश देतात तो सर्वांना मान्य असतो. शिवसेनेत कोणीही नाराज नाही, असं सांगत नवनिर्वाचीत महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी सातमकरांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement