एक्स्प्लोर

Mamata Banerjee Mumbai Visit : भाजप विरोधात तिसरी आघाडी? आज ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट

West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे.

West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishekh Banerjee) देखील त्यांच्यासोबत आहेत. आज 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल (मंगळवारी) ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. 

ममता बनर्जी टीएमसीचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.  

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली होती. ममता बॅनर्जी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं होतं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असंही घोष यांनी सांगितलं होतं. मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर  देण्यात येणार आहे. गोवा,  मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला आहे.  दरम्यान, सोमवारी कोलकातामध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या वर्किंग कमेटीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत हे ठरलं की, पक्ष घटनेत बदल करण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर भाजपला घेरण्यापर्यंत सर्व प्रकारची पावले उचलली जातील. वर्किंग कमिटीच्या सदस्यांची सध्याची संख्या 21 असून ती वाढवण्यात येण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 

भाजप विरोधात तिसरी आघाडी होणार?

ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे, संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाणूनबुजून शरद पवारांची भेट टाळल्याचं बोलंलं जात होतं. राजकीय चर्चांमध्ये तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. मोदींचं वाराणसीत आपला जम बसवण्याच्या प्रयत्न ममता यांचा असणार आहे. 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामाUddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलंThackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्याचौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Health : भर उन्हात मतदान करायला जाताय? त्वचेची काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात...
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा...
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा...
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Embed widget