एक्स्प्लोर
Advertisement
अवघ्या एका महिन्यात डोंबिवलीतील मुख्य रस्ता खड्ड्यात गेला!
या सगळ्याविरोधात डोंबिवलीकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
डोंबिवली : पावसाळा सुरु होऊन अवघे काही दिवस झालेले असताना डोंबिवलीत रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. डोंबिवली पूर्व भागात चार रस्त्याकडून पेंढारकर कॉलेजकडे जाणारा मुख्य रस्ता असून अवघ्या एका महिन्यापूर्वी त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं. मात्र पाऊस पडताच हे डांबर वाहून गेलं आहे.
डोंबिवलीतल्या टिळक पुतळा ते मंजुनाथ शाळा या मुख्य रस्त्यावर तर भीषण परिस्थिती असून ठेकेदाराच्या या निकृष्ट कामाकडे केडीएमसीचे सत्ताधारी आणि प्रशासन या दोघांनीही दुर्लक्ष केलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना मात्र प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या सगळ्याविरोधात डोंबिवलीकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement