एक्स्प्लोर

Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला

Mahesh Tutorials Shut down: महेश ट्युटोरियल्स ही मुंबईतील नामांकित क्लासेसपैकी एक होती. अचानक क्लास बंद झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे.

Mahesh Tutorials Shut down: गेल्या काही वर्षांपासून मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमध्ये प्रचंड गाजावाजा असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची हमी देणारी नामांकित कोचिंग संस्था एम.टी. एज्युकेअर लिमिटेडने (महेश ट्युटोरिल्स) अचानक आपल्या सर्व शाखा बंद करण्याचा सपाटा लावला आहे. महेश ट्युटोरियल्स गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग देणारी (Coaching Classes) संस्था म्हणून प्रचंड लोकप्रिय होती. बारावी, नीट परीक्षा, जेईई, विविध स्पर्धा परीक्षा आणि सीबीएसई व आयसीएससी या मंडळांच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये महेश ट्युटोरियल्स क्लास (Mahesh Tutorials) लोकप्रिय होता. या क्लासमध्ये प्रवेश घेतला की आपल्या पाल्याला चांगले गुण हमखास मिळणार, अशी खात्री पालकांना असायची. त्यामुळे अनेक पालक लाखो रुपये फी भरुन आपल्या मुलांना या क्लासेसमध्ये टाकायचे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये फक्त मुंबईपुरता मर्यादित असलेल्या महेश ट्युटोरियल्सचा पसारा राज्यभरात पसरला होता. गेल्या 38 वर्षांपासून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. साहजिकच इतकी लोकप्रिय संस्था अचानक बंद झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Mumbai news)

प्राथमिक माहितीनुसार, महेश ट्युटोरियल्सने विद्यार्थी आणि पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या क्लासच्या शाखा बंद केल्या आहेत. त्यासाठी संस्था दिवाळखोरीत निघाल्याचे कारण देण्यात आले आहे. 7 जुलैला महेश ट्युटोरियल्सच्या सर्व शाखा चालकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर 10 जुलैपासून महेश ट्युटोरियल्सच्या राज्यातील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी मुंबईतील विद्यार्थ्यांना अरिहंत अ‍ॅकॅडमीने सामावून घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षीची फी अगोदरच भरली असल्याने या पैशांचे काय होणार, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. 

महेश ट्युटोरियल्सच्या सर्व शाखा अचानक बंद झाल्याने पालक क्लासमध्ये फोन करत आहेत. मात्र, सर्व शाखांवरील दूरध्वनी बंद येत आहेत. काही ठिकाणी फोन वाजत असला तरी कोणी उत्तर देत नाही. मुलुंड येथून सुरु झालेल्या महेश ट्युटोरियल्सच्या राज्यभरात तब्बल 60 शाखा होत्या. यापैकी 40 शाखा या मुंबई महानगर क्षेत्रात होत्या.

Why Mahesh Tutorials Shut down: महेश ट्युटोरियल्स क्लास बंद का झाला?

महेश ट्युटोरियल्स क्लासेस दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून याबाबतची प्रक्रिया सुरु होती. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या लेखापरीक्षणात (ऑडिट) संस्थेतील अनियमिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कंपनीवर सध्या 32.33 कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. तसेच काही वादग्रस्त कॉर्पोरेट गॅरंटीचे दायित्त्व आहे. 

आणखी वाचा

Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget