मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाच्या (maharashtra vidhan sabha live) पहिल्या दिवशी विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.  


Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित


या कारवाईनंतर बोलताना शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष  भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भाजपा आमदारांनी केलं आहे.  जी घटना घडली ती मी सभागृहात सांगितली, फडणवीस यांना खोटं बोलण्याची सवय आहे. माझं म्हणणं आहे की आणखी आमदारांना निलंबित केलं पाहिजे, असं जाधव म्हणाले. 


12 विरुद्ध 12...! संघर्ष शिगेला... एकीकडं राज्यपाल नियुक्त 12 आमदार निवडीची प्रतीक्षा तर दुसरीकडं 12 आमदारांचं निलंबन


भास्कर जाधव म्हणाले की,  महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला, पंरपरेला आणि महाराष्ट्राच्या एक वैचारिक विचारसरणीला काळीमा फासण्याचं पाप भाजपाच्या आमदारांनी केलं. मी सभागृहाचं कामकाज संपवून सभागृह दहा मिनिटं स्थगित केलं. स्थगित केल्यानंतर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात. या उद्देशाने कुणीही न सांगता दहा मिनिटांसाठी मी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं, कारण मला देखील इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मी नुसता अध्यक्षांच्या दालनात आलो, तर त्यावेळी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार व नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडले, असं जाधव म्हणाले. 


MPSC : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


जाधव म्हणाले की, मी वरिष्ठ नेत्यांना सांगत होतो की तुम्ही या सर्वांना समजावून सांगा की सभागृहाचा विषय हा सभागृहातच संपतो. सभागृहाच्या बाहेर आल्यावर तो व्यक्तिगत घ्यायचा नसतो, अशा पद्धतीने हाणामाऱ्या करायच्या नसतात. परंतु त्यांनी मला की जे विरोधी पक्ष नेत्यांनी देखील मान्य केलेलं आहे की आमच्या दोन-तीन लोकांकडून काही चुकीचे शब्द गेले, हे त्यांनी सभागृहात मान्य केलेलं आहे. शिवीगाळ केली, माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. माझ्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या, असा अश्लाघ्य प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेत जो स्वतः आमही सुसंस्कृत आहोत, आम्ही म्हणजे अतिशय विचारी लोकांचा, सुसंस्कृत लोकांचा आणि सभ्य लोकांचा पक्ष असल्याचा टेंभा मिरवतात, त्या लोकांकडून अशाप्रकारचं कृत्य व्हावं आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी पाठींबा द्यावा, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.