मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. 

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

  1. डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव
  2. आशिष शेलार, वांद्रे पश्चिम
  3. अभिमन्यू पवार, औसा, लातूर
  4. गिरीश महाजन, जामनेर, जळगाव
  5. अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई
  6. पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई
  7. हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला
  8. राम सातपुते, माळशिरस, सोलापूर
  9. जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे
  10. योगेश सागर, चारकोप, मुंबई
  11. नारायण कुचे, बदनापूर, जालना
  12. कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर