मुंबई : राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शासकीय सेवेत थेट संधी मिळालेल्या खेळाडूंचा उपयोग नवीन खेळाडू घडवण्यासाठी व क्रीडा विकासाठी करता येईल, अशा धोरणाबाबत विचार होणार आहे. तर राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं आणि या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा धोरणात बदल करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक पार पडली. सुधारित धोरणामध्ये गिर्यारोहणासारखे साहसी क्रीडाप्रकार, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आदींबाबतही विचार करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
IPL 2020 | चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल समोर
खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती आणि अनुषंगित मुद्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. क्रीडा क्षेत्रात राज्याचा गौरव वाढवणाऱ्या आणि अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय डिसेंबर 2010 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यातील निकषांनुसार आधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीत छाननी होऊन नंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत खेळाडूंच्या नियुक्तीबाबत निर्णय होतो. शासकीय धोरणातील तरतुदींच्या गेल्या दहा वर्षातील अंमलबजावणीचा आढावा घेऊन नवीन सर्वंकष धोरण ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. खेळांचा सराव आणि स्पर्धेसाठी हजर राहण्यासाठी खेळाडूंना सवलत देणे, माऊंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक, लिम्का किंवा गिनीज् बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले स्पर्धक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू, महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल आदींनाही शासकीय सेवेत संधी देण्याबाबतही सुधारित धोरणात विचार करण्यात येणार आहे.
Shekhar Gawli | माजी रणजीपटू शेखर गवळी इगतपुरीमध्ये दरीत कोसळले, 16 तासांनी मृतदेह सापडला!