Uddhav Thackeray VS Eknath Shinde: अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri By Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूकचिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या (Election Commission)

  दारात सुरु झाली आहे. निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानं धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे. 


अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं शिंदे गटाचा निवडणूक आयोगात दावा केला आहे. या दाव्याची तातडीने दखल घेत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाला मुदत मांडण्याची नोटीस देण्यात आली आहे.  या सर्व घडामोडींमध्ये आता 14 तारखेआधी धनुष्यबाण गोठवलं जाणार का? याबाबत आता सस्पेन्स वाढला आहे.


तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा निवडणूक आयोगाचा दावा


निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून मुदतवाढीची माहिती दिली आहे. तसंच त्यांना हवा असलेला शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. या पत्रासोबत पुन्हा एकदा तो तपशील पाठवला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. 


शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या दाव्याची तातडीनं दखल घेत निवडणूक आयोगानं उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पाहावं लागेल.  शिवाय अंधेरीतल्या पोटनिवडणुकीआधी चिन्हाचा फैसला येणार की चिन्ह गोठवलं जाणार हे स्पष्ट होईल. 




आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटानं आज पहिल्यांदाच आपलं प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केलं. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटानं आज निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली.  बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान 15 ते 20 दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटानं केली होती. मात्र त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या


धनुष्यबाण कुणाचा? वाद आयोगात; 'शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत', ठाकरे गटाचं आयोगाला पहिलं लेखी निवेदन


Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्हासाठी दोन्ही गटात सामना, चिन्हाचं काय होणार?