Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्हासाठी दोन्ही गटात सामना, चिन्हाचं काय होणार?
शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याची लढाई संपली असलीय.. मात्र आता धनुष्यबाण या चिन्हासाठी दोन्ही गटातील राजकीय सामना केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे... शिवसेना आणि शिंदे गटाला या संदर्भात कागदपत्रं सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलीय. दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होतेय. त्यामुळे शिवसेनेतल्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार याची उत्सुकता वाढलीय.. शिंदे गटाची कागदपत्रं आपल्याला आधी पाहायला मिळावीत हा मुद्दा ठाकरे गटानं आधी मांडला होता. त्यामुळं ठाकरे गटाकडून आपली कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणखी अवधी मागितला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय.. याबाबत शिंदे गटाने ४ ऑक्टोबरला आयोगाला पत्र लिहिलंय...