Rahul Shewale: संजय राऊत माफी मागा! खासदार राहुल शेवाळे यांनी बजावली नोटीस
Rahul Shewale Sanjay Raut: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राऊत यांनी दैनिक सामनातील बदनामीकारक वृत्ताबद्दल माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
![Rahul Shewale: संजय राऊत माफी मागा! खासदार राहुल शेवाळे यांनी बजावली नोटीस Maharashtra politics Shivsena Shinde faction MP Rahul Shewale send Defamation notice to Uddhav Thackeray Sanjay Raut Rahul Shewale: संजय राऊत माफी मागा! खासदार राहुल शेवाळे यांनी बजावली नोटीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/04/6ae45d308a62667ac1229b949db72dff1672844168659290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rahul Shewale Sanjay Raut: शिवसेना पक्षावरील दाव्यावरून ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिंदे गटात ( Shivsena Shinde Faction) कोर्टात आणि राजकारणाच्या मैदानात संघर्ष सुरू आहे. आता, या वादात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये राहुल शेवाळे यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून खासदार शेवाळे यांनी हा दावा दाखल केला आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका तरुणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ही तरुणी सोशल मीडियावर सक्रिय आहे. राहुल शेवाळे यांनी या तरुणीसोबत संबंध असल्याचा इन्कार केला होता. त्यानंतर या तरुणीने राहुल शेवाळे यांच्यासोबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
खासदार राहुल शेवाळे यांनी या तरुणीचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानमधून माझ्याविरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचा दावा शेवाळे यांनी केला होता. राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उजाली होती. शेवाळे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी या तरुणीने सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले. या व्हिडिओमध्ये कथित पीडित तरुणीने शेवाळे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. पाकिस्तान, दाऊद इब्राहिमशी माझे संबंध असल्याचा आरोप शेवाळे करीत आहे. मी माझा पासपोर्ट एनआयएला द्यायला तयार आहे. त्यांनी माझा पासपोर्ट तपासावा आणि मी एकदा तरी पाकिस्तानात गेले आहे का हे सांगावे असे आवाहन त्या तरुणीने दिले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तरुणीने राहुल शेवाळे यांचे कराचीत हॉटेल्स आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते किती वेळा दुबई, पाकिस्तानात गेले आहेत याचा एनआयएने तपास करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर य प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामना, दोपहर का सामना या वृत्तपत्रातून चुकीची माहिती पसरवली असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. या वृत्तपत्रातून करण्यात आलेल्या आरोपांमुळे माझ्याबद्दल चुकीची माहिती गेली असल्याचा दावा शेवाळे यांनी केला. या वृत्तांकनाबद्दल बिनशर्त माफी मागण्याची मागणी शेवाळे यांनी वकिलांमार्फत केली आहे. राहुल शेवाळे यांनी दैनिक सामनाचे संपादक, कार्यकारी संपादक, पत्रकाराला नोटीस बजावली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी बजावलेल्या नोटीसमुळे शिंदे आणि ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)