BJP Mission Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. युती आणि आघाडीमधील सर्व पक्षांकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. 'अबकी बार 400 पार' नारा देत भाजप मित्र पक्षांसोबत मिळत तयारी लागली आहे. महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नो रिस्क धोरण ठरवल्याचं दिसून येत आहे. त्यासोबत भाजपने मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.
लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली
मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून अमित शाह यांनी घेतली मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली जात आहे. सद्यस्थितीत महायुती किती जागा जिंकू शकते, याचीही अमित शाह यांनी माहिती घेतली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुासार, पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल, याचीही माहिती केंद्रीय नेत्यांनी घेतली आहे.
शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार
महत्त्वाचं म्हणजे भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर भाजप उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपने मुंबईमध्ये 5-1 चा प्रस्ताव ठेवला आहे, मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याची माहिती आहे. भाजपचा प्रस्ताव शिंदे गटाला मान्या नसल्यानं मुंबईतील जागाबाबतचा अंतिम निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.
भाजपचं नो रिस्क धोरण!
यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. अबकी बार 400 पार असा भाजपने नारा दिला आहे. मिशन 400 प्लसमुळे भाजपने नो रिक्स धोरण ठरवलं आहे. भाजपकडून मित्रपक्षांना फक्त विनिंग सीट दिल्या जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
शिंदे-पवार गटाला फक्त जिंकणाऱ्या जागा
शिंदे आणि अजित पवार, ज्या जागा जिंकू शकतात, अशाच जागा भाजप सोडणार असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती दिली आहे. मिशन 400 पारमुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मानसिकेत नाही, असं यातून स्पष्ट दिसत आहे. भाजप राज्यात 32 जागा लढण्यावर अजूनही ठाम असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :