Maharashtra News : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah), पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह महाराष्ट्रात (Maharashtra) येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात. कधी मोदी येतात, कधी शाह येतात आणि मनोरंजन करतात. पक्ष फोडण्याचा हिशेब मोदी आणि अमित शाहांना द्यावा लागेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर घणाघात केला आहे.


संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार


भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर करताना संजय राऊत म्हणाले की, '370 तुम्ही हटवलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही तेव्हा त्यांच्यासोबत नव्हतो, तरी आम्ही त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता. अमित शाह यांनी आपली स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करुन घेतली पाहिजे.' 370 कलम हटवणाऱ्यासोत सत्ता स्थापन करताना लाज वाटली नाही का, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. 


काश्मिरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा?


राऊत पुढे म्हणाले की, 'काश्मिरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा, काश्मिरी पंडित आले का? हजारो काश्मिरी पंडित आजही निर्वासिताचं जीवन जगत आहेत. त्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत जात नाही, लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मिरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आजही रोज दोन-चार जवान शहीद होत आहेत. 370 लम हटवून तुम्ही काय केलं, याची लाच तुम्हाला वाटली पाहिजे.'


'सर्जिकल स्ट्राईक झाला का? यावर शंका'


यावेळी संजय राऊतांनी सर्जिकल स्ट्राईकवरूनही मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'सर्जिकल स्ट्राईकबाबत तुम्ही खोटं बोलतात. अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का, यावर आजही शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आजही काश्मिरची जनता, काश्मिरचा तरुण बेरोजगार आहे. 370 कलम हटवल्यावर काश्मिरमधील बेरोजगारी लगेच दूर होईल, असं सांगितलं होतं, पण त्याचं काय झालं. आजही काश्मिरमधील जनता बेरोजगार आणि अस्वस्थ आहे, याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे', असं राऊतांनी म्हटलं आहे. 


अखंड हिंदुस्तानच्या घोषणेचं काय झालं?


अखंड हिंदुस्तानची घोषणा केली, पाकव्याप्त काश्मिर आम्ही हिंदुस्तानमध्ये आणू, अशी घोषणा 2014 आणि 2019 ला केली, त्याचं काय झालं, असा सवाल राऊतांनी विचारला आहे. 2019 साली ज्याप्रकारे पुलवाला घडलं किंवा निवडणुकीसाठी घडवलं गेलं, शहीदांचा बाजार मांडला निवडणुकीसाठी, याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.


'भ्रष्टाचाराचं ओझं स्वीकारल्याबद्दल आभार'


शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना राऊत यांनी म्हटलं की, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार यांनी ज्यांना सहन केलं, ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहे. भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले आणि तुम्ही त्यांना स्वीकारलं आणि ते ओझं तुम्ही सहन करताय, असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाहांचे आभार मानले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवारांना सहन केलं, असं वक्तव्य अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Politics : आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट? उद्धव ठाकरे गप्प का? दीपक केसरकरांचा सवाल