Mumbai News : मुंबई (Mumbai), नवी मुंबईनंतर (Navi Mumbai) आता तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. अटल सेतूजवळ (Atal Setu) तब्बल 124 गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे देण्यात आली आहे. अटल सेतू आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे. नवी मुंबईची उभारणी सिडकोने केली होती. मात्र तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे दिली जाणार आहे. त्याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.


अटल सेतूजवळ 124 गावांची तिसरी मुंबई विकसित होणार


तिसरी मुंबई पनवेल, उरण दरम्यान, उभारण्यात येणार आहे. पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे. या क्षेत्रातील 23 गावांचा झपाटयाने विकास होणार असून यासाठी सिडकोने हा मोठा निर्णय घेतला आहे. 


नव्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे


पनवेल , उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे. या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुध्दा ओळखले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण , खालापूर , कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार असली तरी सद्या पहिल्या टप्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 


चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते


नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे. यामुळे  चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे. 


12 नोडची विकासकामे एकाच टप्प्यात होणार


सिडको नैना भागातील 12 नोडची विकासकामे टप्याटप्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीला काम दिले आहे. एकदा आराखडा तयार झाली की पुढील महिनाभरात सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे . या संपूर्ण कामासाठी सिडकोला साधारण 12 करोड रूपये खर्च अपेक्षित आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha 2024 : भाजपचं 'नो रिस्क' धोरण! शिंदे-अजित पवारांना फक्त विनिंग सीट देणार, मुंबईतील 6 लोकसभांवर विशेष लक्ष