(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Speech Highlights : राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी, जाणून घ्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली.
Raj Thackeray Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज मुंबईत राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राज यांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले, त्याच महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महापुरुषांना जातीमध्ये कैद केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- मनसेने कोणतेही आंदोलन अर्धवट सोडले नाही. आपल्या आंदोलनामुळे राज्यातील 65 टोलनाके बंद झाले. आपल्यावरील आरोप चुकीचा
- टोलमुक्त महाराष्ट्रचे आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत असताना आश्वासन पूर्ण का केले नाही, याबद्दल त्यांना विचारा. टोलचा पैसा सगळ्या पक्षांकडे जातो.
- मनसेच्या आंदोलनामुळे 92 टक्के मशिदीवरील भोंगे बंद झालेत. मुस्लिमांकडूनही आंदोलनाचे स्वागत
- महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण कधीच नव्हतं. हे राजकारण नाही. तात्पुरती आर्थिक अॅडजेस्टमेंट आहे.
- 2019 मध्ये मतदान केलेला मतदार आता संभ्रमात असेल, कोणाला मतदान केलंय. कोण, कोणासोबत आहे हेच कळत नसेल.
- छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून पक्षातून बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.
- ज्याचे जास्त आमदार अधिक त्याचा आमदार हे शिवसेना-भाजपमधील अंडरस्टँडिंग, तरीदेखील शिवसेनेने मुख्यमंत्रीपद कसे मागितले. चार भिंतीत कसली कमिटमेंट घेता?
- माझ्याकडे वास्तू नसली तरी विचारांचा वारसा आहे. माझ्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. तो विचार पुढे न्यायचा आहे.
- राजकारण गंभीर, पण सरकारला जनता जाब विचारत नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाने राजकारणात यावे
- उत्तरेकडील राज्यांसारखे महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे.
पाहा: राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकारी मेळाव्यातील संपूर्ण भाषण
टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं?
राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र, याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मनसे आतापर्यंत इतर पक्षांपेक्षाही सर्वाधिक आंदोलन केले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray Speech : शिवसेना सोडण्याआधी बाळासाहेब काय म्हणाले, राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' प्रसंग
- Raj Thackeray Speech : एकमेकांची उणी दुणी सोशल मीडियावर काढायची असेल तर काढून बघा... : राज ठाकरे