मुंबई : आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोलिस (Police) कायमच तत्पर असतात. परंतु, कर्तव्याच्या पुढे जाऊन अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी माणूसकी जपल्याची अनेक उदाहरणे आपण आजपर्यंत पाहिली आहेत. अलीकडे असेच एक उदाहरण समोर आले आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या या कार्याने मुंबई वाहतूक पोलीस दलाची (Mumbai traffic police) मान नक्कीच उंचावेल. मुंबई वाहतूक पोलिस दलातील सहाय्यक फौजदार विलास गुरव (Vilas Gurav) यांनी वरळी नाका येथे रूग्णवाहिकेचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे रूग्णवाहिकेला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली. 


विलास गुरव  यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे मुंबई वाहतूक दलाकडून कौतुक करण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर फौजदार विलास गुरव यांचा रूग्णवाहिकेला रस्ता करून देत असतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. गुरव यांनी  14 सप्टेंबर रोजी वरळी नाका येथे रूग्णवाहिकेचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे रूग्णवाहिकेला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली.  


मुंबई पोलिसांनी ट्विटरवर काय म्हटले आहे?
"वर्दीचा राखून सन्मान, ठरला मुंबईचा अभिमान! सहाय्यक फौजदार विलास गुरव यांनी काल वरळी नाका येथे अँब्युलन्सचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे अँब्युलन्सला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली. त्यांच्या या कामाला सलाम, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.  






सोशल मीडियावर कौतुक 
मुंबई पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत विलास गुरव यांचे सोशल मीडियावरून कौतुक करण्यात येतंय. 


महत्वाच्या बातम्या


Deepak Kesarkar In Pune: आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही; दीपक केसरकराचा हल्लाबोल 


Supriya Sule In Pune : तुम्ही राजीनामा देऊन दादांना मुख्यमंत्री करा, आम्हीही मोठा प्रोजेक्ट आणू; फॉक्सकॉन वेदांता वादावर सुप्रिया सुळेंची टीका