मुंबई : भारतीय लोकांमध्ये रहदारीच्या नियमांबद्दल अनेकदा माहितीचा अभाव पाहायला मिळतो. सिग्नलसह अनेक रहदारीच्या नियमांना अनेक वाहनचालक केराची टोपली दाखवतात. असाच एक प्रकार मुंबईच्या रस्त्यावर पाहिला मिळाला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर तर वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दुचाकीवर जास्तीत जास्त दोन जणांना परवानगी असते, अगदीच लहान मुलं असेल तर तीन जणांना जाण्याची परवानगी असते. मुंबईत मात्र  एका बाईकवरून चक्क सहा मुलं जीवघेणा प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


हा व्हिडीओ  मुंबईतील स्टार बाजार, अंधेरी ईस्ट  रोडवरील  आहे. या व्हिडिओमध्ये एकाच बाइकवर सहा मुले बसली आहेत. ही सहा मुले अल्पवयीन आहेत. बाइकवर पाठीमागे बसलेल्या एका मुलाच्या खांद्यावर दुसरा मुलगा बसला आहे, असा जीवघेणा प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा व्हिडीओ रामदीप सिंह होरा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला. त्यांनर रोड्स ऑफ मुंबईने हा ट्विट शेअर  करत मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी जवळील  वाहतूक नियमन विभागाला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले.  






 


धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अवजड ट्रक, डंपरचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. असा प्रवास करताना एखादा अपघात झाला तर, मोठी जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे जीवावर बेतणारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.  


संबंधित बातम्या :