Mumbai Coronavirus Cases : सोमवारी मुंबईत 1 हजार 857 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांतील ही सर्वांत कमी रुग्णसंख्या असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाची डोकेदुखीही कमी झाली आहे. मुंबईत रविवारी 2 हजार 250 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज ही रुग्णसंख्या आणखी कमी झाली आहे. पण राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमांचे पालन करणं मात्र महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 1 हजार 857 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 546 झाली आहे. तर मागील 24 तासांत 503 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
19 जानेवारी | 6, 032 |
20 जानेवारी | 5,708 |
21 जानेवारी | 5,008 |
22 जानेवारी | 3,568 |
23 जानेवारी | 2250 |
24 जानेवारी | 1857 |
सध्या मुंबईतील 27 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 857 रुग्णांपैकी 234 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 742 बेड्सपैकी केवळ 3 हजार 855 बेड वापरात आहेत.
इतर बातम्या :
- Omicron Variant : मुंबईत सुमारे 88 टक्के रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटचे, जनुकीय अहवालातून स्पष्ट
- Covid 19 Cases in India : भारत कोरोनामुक्त कधी होणार? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
- Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha