Coronavirus In Mumbai : मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्यामध्ये घट होत आहे. मागील दोन दिवसांत रुग्णसंख्यामध्ये मोठा उतार दिसून येत आहे. मुंबईतील कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. मुंबईतही ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली तरी ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. कस्तुरबा प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालानुसार मुंबईतील दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी 88 टक्के रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटचे आहेत. तर फक्त 10 टक्के रुग्ण डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे आढळले आहेत.
तज्ज्ञांकडून ओमायक्रॉनच्या समुह संसर्गाबाबत चर्चा झाली आहे. कस्तुरबा प्रयोगशाळेतील जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल समोर आला आहे. 363 रुग्णांच्या नमुन्यांपैकी 320 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळले आहेत. तर तीन जणांना डेल्टा आणि 30 जणांना डेल्टाच्या उपप्रकरांची लागण झाल्याचे आढळले. याव्यतिरिक्त 10 रुग्णांना करोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर मृत्यु झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं डेल्टाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळले आहे. म्हणजे, ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या जास्त आहे, पण ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्याचे आणि मृताचे प्रमाण खूपच कमी आहे.
जानेवारी महिन्यात मुंबईत आढळलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर...
| दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
| 1 जानेवारी | 6347 |
| 2 जानेवारी | 8063 |
| 3 जानेवारी | 8082 |
| 4 जानेवारी | 10860 |
| 5 जानेवारी | 15166 |
| 6 जानेवारी | 20181 |
| 7 जानेवारी | 20971 |
| 8 जानेवारी | 20,318 |
| 9 जानेवारी | 19474 |
| 10 जानेवारी | 13,648 |
| 11 जानेवारी | 11,647 |
| 12 जानेवारी | 16,420 |
| 13 जानेवारी | 13, 702 |
| 14 जानेवारी | 11, 317 |
| 15 जानेवारी | 10, 661 |
| 16 जानेवारी | 7, 895 |
| 17 जानेवारी | 5, 956 |
| 18 जानेवारी | 6, 149 |
| 19 जानेवारी | 6, 032 |
| 20 जानेवारी | 5,708 |
| 21 जानेवारी | 5,008 |
| 22 जानेवारी | 3,568 |
| 23 जानेवारी | 2250 |