Dhananjay Munde Case : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातच आता एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. एवढंच नाही तर हेगडे हे धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंबोली पोलिस ठाण्याकडं निघाले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.


कृष्णा हेगडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, 2010 पासून रेणू शर्मा ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता 6 जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे. धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, असं हेगडे म्हणाले.


Dhananjay Munde : बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले...


हेगडे म्हणाले की, मला माहिती मिळाली की ती दुसऱ्यांना देखील फसवत होती. आता माझ्या तक्रारीनंतर अजून लोकं बाहेर येऊन तक्रार करतील. माझा तिच्याशी काही संबंध नाही. जर माझा संबंध नाही तर कुण्या महिलेचं नाव का खराब करायचं म्हणून मी बोललो नाही. तिला म्युझिक स्टुडिओ काढायचा आहे, त्यासाठी पैसे हवेत. आता धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे. मला आता त्यांना टार्गेट केलेलं दिसलं त्यामुळं मी आता बोललो. मुंडे यांना फसवलं जात असल्याचा आरोप देखील कृष्णा हेगडे यांनी केला. हेगडे म्हणाले की, मी 2010 मध्ये या महिलेची माहिती काढली. मला मिळालेल्या माहितीमुळं मी तिला दुर्लक्षित केलं. मला तिनं सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असं ते म्हणाले.


Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार


धनंजय मुंडे म्हणतात...


राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार आणि पक्ष नेतृत्व विचार करुन निर्णय घेतील. याबाबत मी स्वत: शरद पवार यांना भेटलो आहे. त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व सविस्तर माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणाची सर्व माहिती मी प्रसारमाध्यमांना दिली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. .


Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?


धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार 


धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला." "धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढे मांडणं. त्यांची मतं जाणून घेत पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ," असं शरद पवार म्हणाले.



संबंधित बातम्या


धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, भाजपची मागणी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार


"प्यार किया तो डरना क्या.? शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण 


Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?


 Dhananjay Munde : बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले... 


Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार