Central Railway : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचं प्रकरण समोर आलं होतं, मध्य रेल्वेच्या आरपीएफने या प्रकरणी 15 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकल ट्रेन लोखंडी ड्रमला धडकल्याचं प्रकरण, 15 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले
काही दिवसांपूर्वी मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळून जात असताना एका ड्रमला ट्रेन धडकली होती. मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर मोठा घातपाताचा कट उधळून लावण्यात आला होता. मध्य रेल्वे मार्गावरील रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा घातपाताचा डाव उधळण्यात आला आहे. सँडहर्स्ट रोड (Sandhurst Road) ते भायखळा (Byculla) स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रुळावर 15 ते 20 किलो दगडाने भरलेला लोखंडी ड्रम रुळावर ठेवला होता. पण मोटरमन अशोक शर्मा यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला होता. गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival 2022) पार्श्वभूमीवर हा घातपाताचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तो ड्रम ट्रॅकवर पाहून त्याने आपत्कालीन स्थितीत ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले.
...त्यामुळे तो ड्रम रेल्वे रुळावरच पडून होता.
या दुर्घटनेनंतर सर्व यंत्रणांची झोप उडाली होती, हा घातपाताचा संशय असल्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं. तपास केला असता ड्रममध्ये दगड नसून तो ड्रम लोखंडाचा असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी माहिती मिळवताच असे समजले की, एका 15 वर्षीय मुलाने तो ड्रम चोरला असून तो विकल्यास काही पैसे मिळाले असते असे आढळून आले. अल्पवयीन मुलाने रेल्वे पाहताच ड्रम तेथेच टाकून पळ काढला होता. त्यामुळे तो ड्रम रेल्वे रुळावरच पडून होता.
राज्यात सतर्कतेचा इशारा
सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या व्हॅट्सअॅपवर धमकीची मेसेज आले होते. त्यानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या धमकीनंतर आता रेल्वे ट्रॅकवर ड्रम ठेवून घातपाताचा कट रचण्यात आला का? असा संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु होता. या तपासाअंती पोलिसांनी एका 15 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान राहुल गांधींच्या टी-शर्टवरून वाद, भाजप-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी