Maharashtra Live Updates: विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा, ठाकरे गटाच्या सुनील मोदींची याचिका फेटाळली
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE
Background
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात सध्या बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वातावरण तापलंय. भाजपच्या सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या बैठकांचं सत्र देखील सुरु आहे. विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ठरवली जातेय.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा, ठाकरे गटाच्या सुनील मोदींची याचिका फेटाळली
राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा
कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर, आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली
शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरअध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल केली होती याचिका
वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
वाल्मिक कराडची अटक खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं आहे तर मग pmla कायदा का लागू केला नाही?? 11 डिसेंबर एफआयआर आहे त्यात वाल्मिक कराडच नाव आहे. आवादा कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. खंडणीची नोटीस असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? एकीकडे तुम्ही नुसत्या आरोपांवर गुन्हा दाखल करता आणि इथ केस आहे तिसरी एफआयआर दाखल केली आहे. मग वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही???, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
आदित्य ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, विविध मुद्यांवर चर्चा
आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
निवृत्त पोलिसांच्या घरांबाबत चर्चा
सर्वांसाठी पाणी योजनेवर देखील चर्चा
टोरेस घोटाळ्याबाबत चर्चा, आदित्य ठाकरेंची माहिती
EOW चं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल
टोरेस घोटाळा प्रकरणी EOW चं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल
दादरच्या टोरेस कार्यालयातील लाॅकरमध्ये ५ ते ६ कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती
पृथ्वीराज चव्हाणांनी आम आदमी पार्टीत जावं, काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचं मोठं वक्तव्य
-पृथ्वीराज चव्हाणांनी आम आदमी पार्टीत जावं, काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचं मोठं वक्तव्य
- आम आदमी पार्टी चांगलं काम करतेय, असं वाटत असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या पक्षात जावं, असं वक्तव्य संदीप दीक्षित यांनी केलं. दिल्लीत आप विजयी होईल, असं चव्हाण म्हणाले होते.