एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दाढी-मिशी येणार, नावही बदलणार, ललिताची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी!

जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीच्या प्रक्रियेतील ही पहिली शस्त्रक्रिया आहे. सहा महिन्यांनी तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे.

मुंबई : बीडमधील पोलिस शिपाई ललिता साळवेची ललित कुमार बनण्याची पहिली शस्त्रक्रिया शुकव्रारी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात झाली. सहा डॉक्टरांच्या पथकाने केलेली चार तासांची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. ललिताची प्रकृती नॉर्मल असून पुढील काही दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीच्या प्रक्रियेतील ही पहिली शस्त्रक्रिया आहे. सहा महिन्यांनी तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे. ललिता साळवेचं लिंग जन्मत:च अविकसित होतं. कुटुंबीयांना ललिता मुलगी वाटली, परिणामी तिचं संगोपन मुलींसारखचं झालं. शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वी रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन आणि शस्त्रक्रिया पथकाचे प्रमुख डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, "ललिताचा ललित बनण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ललिताच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे महिलांचे अवयव नाहीत. तिच्या शरीरात पुरुषांमध्ये असणारे हॉर्मोन्स आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन आम्ही तिच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये एक नळी टाकली आहे, जेणेकरुन येत्या काळात ती पुरुषांप्रमध्ये उभं राहून लघुशंका करु शकेल. "रुग्णालयात अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेची माहिती मीडियामध्ये आल्यानंतर आम्हाला अनेक लोकांचा संबंधित शस्त्रक्रियेसाठी कॉल येत आहेत," असंही डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं कोणताही खर्च नाही रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यत: अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांचा खर्च खासगी रुग्णालयांमध्ये 1 ते 1.5 लाख रुपये असतो. मात्र ललिताच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च रुग्णालय उचलत आहे. यासाठी काही सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जात आहे. दाढी-मिशाही लावणार डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, "ललिता पूर्णत: पुरुष बनल्यानंतर सहा महिन्यांनी तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर तिच्या चेहऱ्यावर दाढी-मिशाही ट्रान्सप्लांट केल्या जातील, जेणेकरुन तिला पूर्णत: पुरुष झाल्याची भावना निर्माण होईल. लिंग होतं, पण अविकसित जन्माच्या वेळीच ललिता साळवेचं लिंग अविकसित होतं. शिवाय अंडाशयही दिसत नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांना ललिता मुलगी वाटली आणि त्यांनी तिचं संगोपन मुलीप्रमाणेच केलं. वयाच्या सातव्या वर्षी ललिताच्या अंडाशयाला ट्यूमर समजून एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करुन ते काढलं होतं. ललिताला 'जेंडर डिस्फोरिया' पुढे ललिताला महिला पोलिस दलात शिपाई म्हणून नोकरी मिळाली. मात्र तिला कायमच पुरुषासारखं जगायचं होतं. 2016 मध्ये तपासणीदरम्यान पहिल्यांदाच ललिताला 'जेंडर डिस्फोरिया'ची समस्या असल्याचं डॉ. रजत कपूर यांना  समजलं होतं. सेंट जॉर्ज रुग्णालयाचे प्‍लास्‍ट‍िक सर्जन डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, "जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीसाठी शुक्रवारी झालेली पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सहा महिन्यांनंतर दुसरी सर्जरी केली जाणार आहे. यानंतर ललिता सामान्य पुरुषासारखीच जगू शकेल."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
Embed widget