एक्स्प्लोर

Maharashtra : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारणही समोर

Maharashtra Cabinet Decision : जनगणनेच्या या राष्ट्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या काळात करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा असे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी 'जनगणना 2027' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे.

या निर्णयानुसार, आता राज्य शासनाला 30 जून 2026 पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी मूळ बदली अधिनियमात कायदेशीर सुधारणा करण्याचा मसुदाही मंजूर करण्यात आला आहे.

Census 2027 Impact : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामुळे बदल्या लांबणीवर

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात केल्या जातात. मात्र, सध्या देशात 'जनगणना 2027' अंतर्गत पहिला टप्पा सुरू होत आहे. यामध्ये घरयादी तयार करणे व घरगणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत केले जाणार आहे. जनगणनेच्या या राष्ट्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या काळात करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने बदल्यांची मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Transfer Regulation Act : बदली अधिनियमात होणार मोठी सुधारणा

या मुदतवाढीसाठी 'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005' मध्ये आवश्यक ती सुधारणा केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने या कायदेशीर मसुद्यास मंजुरी दिली असून, या मुदतवाढीबाबतचा अधिकृत अध्यादेश (Ordinance) राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने आणि मान्यतेने लवकरच जाहीर केला जाईल. यामुळे जनगणनेच्या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा येणार नाही.

Sawantwadi Railway Station : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लाभणार मधु दंडवते यांचे नाव

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोकणवासीयांसाठी दुसरा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि देशाचे माजी अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नवीन नाव अधिकृतपणे 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' असे होणार आहे.

Konkan Railway Architect : कोकणच्या विकासातील शिल्पकाराचा गौरव

स्व. मधु दंडवते यांनी देशाचे रेल्वेमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम करताना कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. कोकण रेल्वे सुरू व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आणि संसदेबाहेर पाठपुरावा केला. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे कोकण रेल्वे धावू शकली, अशी संपूर्ण कोकणवासीयांची भावना आहे. सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget