मुंबई : कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.


कोरोना महामारीच्या काळात आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्याचं अधोरेखीत झालं आहे. राज्यात रुग्णालयांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचं ठरवलं आहे. राज्यात संसर्गजन्य आजारांसाठी अद्यावत रुग्णालयांची गरज आहे. राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार आहेत. महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार आहे. महापालिका परिसरात पाच वर्षात पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यावर्षी 800 कोटी देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.


Maha Budget 2021 : अर्थसंकल्पातून अजित पवारांनी पुण्याला काय काय दिले?


नवीन मेडिकल कॉलेजेस उभारणार


राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय रुग्णालये स्थापन करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक, साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.


Maharashtra Budget 2021 LIVE: मद्यावरील कर वाढवला, अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत काहीही घोषणा नाही


पाहा... राज्याचा अर्थसंकल्प लाईव्ह