मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटात एक बस 100 फूट खोल दरीत जाता-जाता वाचली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. ही बस गोव्यावरून मुंबईला येत होती. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवानं अपघातात एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. दरम्यान या गाडीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.


मुंबईला जाणाऱ्या मार्गावर लोणावळा घाट उतरताना बसवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस बॅरेकेट तोडून बाहेर निघाली. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खोल 100 फूट दरीत पडताना बस थोडक्यात वाचली. रस्त्याच्याकडेला असलेल्या लोखंडी बॅरेकेटमध्ये बसचा मागील भाग अडकल्याने बस दरीत पडताना वाचली . यावेळी बस मध्ये 35 प्रवाशी होते. अर्थवट अडकलेल्या बसमधून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.