Maharashtra Budget 2021 LIVE: मद्यावरील कर वाढवला, अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत काहीही घोषणा नाही

Maharashtra Budget Session 2021 LIVE Updates : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पातील महत्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2021 03:27 PM
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra Budget 2021 LIVE: राज्य सरकारचं बजट होतं की मुंबई महानगरपालिकेचं बजट होतं, महापालिकेच्या अनेक योजना या बजटमध्ये घोषित केल्या : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #Budget2021
तीर्थक्षेत्र विकासाचे कार्यक्रम आधीपासूनच सुरु आहेत, आमच्या सरकारच्या काळातच पैसे दिले आहेत : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली, बजेटमधून शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही, ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी, वीज बिल माफीबाबतही घोषणा नाही : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Budget 2021 LIVE: पेट्रोल डिझेलवर एकही पैसा कमी केला नाही, त्यामुळं सरकारला पेट्रोल डिझेल भावावर बोलण्याचा अधिकार नाही : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
Maharashtra Budget 2021 LIVE: शेतकऱ्याला मदत करण्यात आलेली नाही, विजबिलाच्या संदर्भातही अत्यंत फसवी घोषणा केली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #Budget2021 https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
अर्थसंकल्पातून पूर्णपणे निराशा झाली, हा राज्याचा नव्हे तर विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
10 हजार 226 कोटी महसुली तूट, राजकोशीय तूट 66 हजार कोटी : अजित पवार
राज्य सरकारने मद्यावरील कर वाढवला, मात्र पेट्रोल-डिझेलबाबत घोषणा नाही
कोरोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आली. विविध उद्योगांशी केलेल्या करारांच्या माध्यमातून राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार आणि या माध्यमातून 3 लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत.
मद्यावरील कर वाढवला, अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत काहीही घोषणा नाही
Maharashtra Budget 2021 LIVE: महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी दिडशे कोटी उपलब्ध करून देण्यात येतील, MPSC च्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी ₹ ची तरतूद : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks
साखर व्यवसायाचा इतिहास व माहिती देणारे संग्रहालय पुण्यातील साखर संकुलात उभारण्यात येईल.
निसर्ग पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन धोरण जाहीर करणार.
Maharashtra Budget 2021 LIVE: घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी संत जनाबाई यांच्या नावाने योजना, त्यासाठी 250 कोटी रुपये बीजभांडवलाची तरतूद : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks
'बर्ड फ्लू' सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार
राज्यातील आठ मंदिरांचं संवर्धन करणार, पहिल्या टप्प्यात या मंदिरांसाठी 101 कोटींची तरतूद
नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णयाची घोषणा. त्यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामीनी योजनेची घोषणा.
कोरोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आली. विविध उद्योगांशी केलेल्या करारांच्या माध्यमातून राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार आणि या माध्यमातून 3 लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत.
पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटींचं तरतूद : अर्थमंत्री अजित पवार
कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिंग आणि त्याचबरोबर सोलापूरच्या बोरामनी विमानतळाच्या क्षमता वाढीसाठीही भरीव निधी
मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गिका बांधणार : अर्थमंत्री अजित पवार
पुण्याजवळ नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार : अर्थमंत्री अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार. : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks
Maharashtra Budget 2021 LIVE: रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींच्या निधीची तरतूद, आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटींची तरतूद : अजित पवार #Budget2021 https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार : अर्थमंत्री अजित पवार
युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार
डोंबिवली, मिरा-भाईंदर, कोलशेत या ठिकाणी जेट्टी उभारणार : अर्थमंत्री अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: वेरूळचे ऐतिहासिक महत्व जाणून पर्यटन वाढीच्यादृष्टीने नवे विमानतळ उभारणार, पुण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार. : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
Maharashtra Budget 2021 LIVE: जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद : अजित पवार #Budget2021 https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
Maharashtra Budget 2021 LIVE: ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस उपलब्ध करून देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार : अजित पवार #Budget2021
Maharashtra Budget 2021 LIVE: महिला दिनी मोठी घोषणा, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार : अजित पवार
बस स्थानकांच्या विकासाठी 1,400 कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी 2570 कोटींची तरतूद : अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: घरकुल योजनेसाठी 6800 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल : अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
Maharashtra Budget 2021 LIVE: गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910

Maharashtra Budget 2021 LIVE: मोठी घोषणा: पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910

जलसंपदा विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद, पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी 3,700 कोटींची तरतूद : अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: मोठी घोषणा : पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचं नाव : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार, 2021- 22 कृषी पशु संवर्धन योजनेसाठी
3274 कोटी प्रस्तावित : अजित पवार
चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपये देणार, राज्यभरात अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटीका केंद्र : अजित पवार
Maharashtra Budget 2021 LIVE: एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1,500 कोटींचा महावितरणला निधी, विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी : अजित पवार #Budget2021 @AjitPawarSpeaks https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-2021-live-updates-health-sector-allocation-cm-announces-budget-2021-maharashtra-vidhan-sabha-budget-session-876910
3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज : अजित पवार
प्रत्येक जिल्ह्यात कोविड पश्चात उपचार केंद्र उभारणार, प्रत्येक रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणं लावणार : अजित पवार
उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली, कृषी क्षेत्रात 11% वाढ झाली आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणूण प्रयत्न केले : अजित पवार
राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद, नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार : अजित पवार
कोरोनाच्या संकटाचं आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावं लागतंय : अजित पवार
सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार, कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद : अजित पवार
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटीतील केवळ आठ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळाली आहे. कोरोनामुळे एसटीतील 106 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात आले आहे. मात्र 106 पैकी केवळ 8 कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना विमा कवच दाव्याची 50 लाखांची रक्कम अदा करण्यात आली आहे, तर 3 मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना ही रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे. अटी व शर्तींची पूर्तता न केल्याने इतर कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आली. भाजप आमदार आशिष शेलार, प्रशांत ठाकूर अशा आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर परिवहन विभागाची विधानसभेतील लेखी उत्तरात माहिती दिली आहे.
अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत, सुरुवातीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या
अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करुन राज्य सरकार जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या किंवा केंद्र सरकारने त्यामध्ये वाढ केली की राज्य सरकारला मिळणाऱ्या व्हॅटच्या टक्केवारीमध्येही वाढ होते.
गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. कोरोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याने त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी सरकार काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकार नवीन काही घोषणा करेल का, याकडेही लक्ष लागून आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पाच विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी फक्त महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात अशी एकूण 189 महिला विशेष केंद्र सुरू असून त्यातील सर्वाधिक 19 केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत.
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.


 


महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी काय मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळालं असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून रविवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 11,141 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 97,983 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


 


राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. काही शहरात रात्रकालीन लॉकडाऊन लावण्यात आला आहे.


 


या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी सरकार काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकार नवीन काही घोषणा करेल का, याकडेही लक्ष लागून आहे.


 


Maharashtra Budget 2021 Date, Time: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; पेट्रोल-डिझेल दरात सवलत मिळण्याची शक्यता


 


पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी होणार?


 


गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. कोरोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याने त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


 


पेट्रोल-डिझेल दरात सवलत?


 


अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने 2018 साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे.


 


सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट आणि सेस आकारला जातो. पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आणि 10.20 रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट आणि 3 रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये दुष्काळ सेसचाही समावेश आहे. महिला दिनी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने महिलांसाठी काही विशेष घोषणा असणार का याकडे देखील लक्ष असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.