एक्स्प्लोर

90 मिनिटे चार्जिंग करा, 120 किमी पळवा, राज्य सरकारच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार

राज्य सरकारच्या ताफ्यात 14 इलेक्ट्रिक कार सहभागी झाल्या आहेत. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी या कार महत्त्वाच्या आहेतच, शिवाय यामुळे इंधनाचा मोठा खर्च वाचणार आहे.

मुंबई : राज्य सरकार आता नवीन गाडी खरेदी करताना पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना फाटा देत विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार विकत घेणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत मंगळवारी पाच इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ई-व्हेईकल्सचं हस्तांतरण मंत्रालयाच्या प्रांगणात पार पडलं. मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राम शिंदे या मंत्र्यांनी या इलेक्ट्रिक कारमधून मंत्रालयाची सैर केली. डीसी किंवा एसी करंटवर या गाड्या चार्ज करता येणार आहेत. मंत्रालयात तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. एकदा कारची बॅटरी चार्ज केल्यावर 120 किमी अंतर ही कार पार करू शकणार आहे. पुढील सहा महिने या गाड्यांचा परफॉर्मन्स तपासून बघितला जाणार आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी 14 गाड्या आपल्या ताफ्यात नव्याने घेणार आहे. येत्या वर्षभरात अशा एक हजार गाड्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या Energy Efficiency service limited या संस्थेतर्फे इलेक्ट्रिक कारचा कार्यक्रम राबवला जात आहे. इलेक्ट्रिक कारचं वैशिष्ट्य इलेक्ट्रिक कार ही सीएनजीवर चालणाऱ्या कारपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही कारमध्ये बसलेले असताना गाडी चालू कधी झाली हेही तुम्हाला कळणार नाही. इंजिनचा आवाज नसल्यामुळे ध्वनी प्रदूषण टळणार आहे. शिवाय यामधून कोणताही धूर निघणार नसल्यामुळे वायू प्रदूषणही होणार नाही. ही कार एकदा चार्ज केल्यास 120 किमी चालू शकते. डीसी करंटवर चार्जिंग केल्यास 90 मिनिटात चार्जिंग पूर्ण होईल, तर एसी करंटवर चार्जिंग केल्यास 12 तास लागतील. या कारला इंधनाचा कोणताही खर्च नसेल. सरकारकडून चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर आता भर दिला जाणार आहे. पुढच्या वर्षभरात टाटा आणि महिंद्राकडून तयार होणाऱ्या या एक हजार कार राज्य सरकारच्या ताफ्यात जमा होणार आहेत. दररोज वाढणारे इंधनाचे दर आणि सीएनजी स्टेशनबाहेर लागणाऱ्या रांगा पाहता हा एक नवा पर्याय ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget