एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session : आदित्य ठाकरेंचा 'तो' शब्द सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी, मुनगंटीवारांचा पारा चढला, ठाकरेंसाठी जयंत पाटील मैदानात!

Maharashtra Assembly Session : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका शब्दावर सत्ताधारी आक्रमक झाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Maharashtra Assembly Session : विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना  शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले. या उत्तरावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. विरोधकांमधील ज्येष्ठ सदस्यांसह आदित्य ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. 

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एकही बालमृत्यू कुपोषणाने झालेला नसल्याची माहिती सभागृहात दिली. याबाबतची सर्व माहिती हायकोर्टात दिली असल्याचे त्यांनी म्हटले. यावर काँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत मंत्र्यांनी दिलेले उत्तर असंवेदनशील असल्याचे म्हटले. हे उत्तर म्हणजे आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले उत्तर पटलावरून काढण्याची मागणी केली. त्यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी वारंवार असंवेदनशील म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले.ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची असून फक्त अदिवासी विभागांची नसल्याचे सांगितले. 

या चर्चेत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. आदिवासी सामाजाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला ही लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य आदित्य यांनी केले. आदित्य यांच्या या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले. संसदीय भाषा वापरली पाहिजे असे म्हणताना मुनगंटीवार यांचा पारा चढला. लाज वाटली हा शब्द वापरला नाही पाहिजे. अडीच वर्ष कोण कोण सत्तेत होतं.-आपल्या वडिलांना लाज वाटली का, अस म्हणताय का? असा सवाल मुनगंटीवार केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी आदित्य यांच्या मदतीसाठी जयंत पाटील धावून आले. आदिवासी मंत्री यांच्या मदतीला वन मंत्री धावले आहेत. मात्र, त्यांनी गैरसमज करु नये असे पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनीदेखील आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असं म्हणालो असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षांनी लाज वाटली पाहिजे हा असंसदीय शब्द असल्याचे सांगत  मी तपासून यावर निर्णय घेईल असे म्हटले. 

दरम्यान, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 

पाहा व्हिडिओ: आदिवासी योजनांवरुन राडा, आदित्य ठाकरे विरुद्ध सुधीर मुनगंटीवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Tribute Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा, आणि अमित शाह यांनी वाहिली श्रद्धाजंलीABP Majha Headlines :  10 AM : 27 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTuljapur Sarpanch Attack : कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, तुळजापुरात सरपंचावर जीवघेणा हल्लाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :27 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Raj Thackeray : मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करुन दाखवता आलेलं नाही: राज ठाकरे
Ind vs Aus 4th Test : ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
ज्याची भीती होती तेच घडलं! कर्णधार रोहित शर्माचे नशीबच फुटकं, सलामीवीर म्हणून आला अन्...
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
मेलबर्नमध्ये चाहत्यांची घुसखोरी; कोहलीच्या गळ्यात टाकला हात अन्... मैदानात नेमकं काय घडलं? पाहा Video
Embed widget