Maharashtra Assembly session Floor Test Live Updates : मुख्यमंत्री शिंदे शिवाजी पार्क येथे दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

Maharashtra Politics LIVE :राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी कसोटी आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी पार पडणार आहे. याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jul 2022 07:57 PM
मुख्यमंत्री शिंदे शिवाजी पार्क येथे दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते शिवाजी पार्क येथे पोहोचले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर दाखल, बाबासाहेबांच्या स्मारकाला केलं अभिवादन

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. शिंदे यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेतील बंडखोर आमदार देखील उपस्थित होते.  

Eknath Shinde : पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट लवकरात लवकर कमी करू, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणी


Eknath Shinde : युतीचे सरकार पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. तसेच हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटींचा निधी देणार आहे. 

Eknath Shinde : बाळासाहेबांचा अजेंडा मोदी सरकार चालवत आहे. : एकनाथ शिंदे


Eknath Shinde : हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे आहे. सर्वांना योग्य निधी देणार आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्हाला भाजीवाला, रिक्षावाला म्हणून हिणवलं.  बाळासाहेबांचा अजेंडा मोदी सरकार चालवत आहे. : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : शिवसैनिकाच्या जीवनात आमूलाग्र बदल करणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सत्तेचा फायदा शाखा प्रमुख, जिल्हाप्रमुखाला झाला पाहिजे.  सत्तेचा फायदा हा तळागाळातील शिवसैनिकांना झाला पाहिजे. मुख्यमंत्री शिवसेनेचा  होता तरी फायदा शिवसैनिकांना होत नव्हता. आमच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिकांच्या जीवनात बदल करण्यचा प्रयत्न करणार आहे. 

Eknath Shinde : 200 आमदार निवडून आणू... नाही आणले तर गावाला जाऊ : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताना जीव टांगला होता. बंडामागे हिंदुत्वाचा विचार आहे. मी आणि फडणवीस मिळून आम्ही 200  आमदार निवडून आणणारआहे. नाही केला तर गावाला शेती करायला जाईल. 

Eknath Shinde : नाकाबंदीतून मार्ग कसा काढायचा, मलाही माहिती आहे : एकनाथ शिंदे

Eknath Shinde : आम्हाला अडवण्यासाठी आयजीला नाकाबंदी करण्यास सांगितले. पण मलाही, माहिती आहे, नाकाबंदीतून मार्ग कसा काढायचा. इतके वर्षे मी पण काम केले आहे. 

Eknath Shinde : पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता : एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : आम्ह नैसर्गक युती केली आहे. राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसने अतिरिक्त मतं घेतली होती. वाटलं तरीही आमचा उमेदवार येईल मात्र, पण पडला. पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता : एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : माझं खच्चीकरण करण्यात येत होतं, न्याय मागण्यासाठी बंड केला, आता माघार नाही: एकनाथ शिंदे

महाविकास आघाडीमध्ये माझं खच्चीकरण होत होतं, विधानपरिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. आता सेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण मागे हटणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

तुम्ही मदतीला धावून जाता हे खरं आहे. मी तुमचं काम खूप मोठं काम पाहिलं आहे - भास्कर जाधव
माझं आवडो अथवा किंवा नको ऐकून घ्यावं लागेल. तुमच्या नेत्याने ऐकलं पाहिजे सांगितलं आहे त्याचं पालन कराल अशी आहे. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. मी गेले 8 दिवस झोपलेलो नाही. मी कधी विचलित, अस्वस्थ होत नाही, पण चेहऱ्यावर लपवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे आजही मी शिवसेनेचा, बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा वारसदार असल्याचं सांगत आहेत. एकनाथराव तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्यात फार काही उठबस झालेली नाही. मी शिवसेनेत आलो आणि गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सत्कार केला. तुमच्या दालनात कधीही आपली भेट झालेली नाही. मी तुमची कामाची पद्धत कोकणातल्या पुरात पाहिली होती. तुम्ही मदतीला धावून जाता हे खरं आहे. मी तुमचं काम खूप मोठं काम पाहिलं आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
 येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील याचा मला विश्वास - देवेंद्र फडणवीस 

आजही एकनाथ शिंदे 400 ते 500 लोकांना भेटतात. मी एकनाथ शिंदेंना सांगितले की मुख्यमंत्र्यानी थोडी वेळ पाळली पाहिजे. मला असं वाटत आहे की याची त्यांनी सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील याचा मला विश्वास आहे. सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. कुणी आंदोलन करत आहे म्हणून ते आपले विरोधक आहेत असे मानने योग्य नाही. आंदोलक कधी आक्रमक झाले तर कारवाई करावी लागते. पण आमच्याविरुद्ध एक शब्द बोललात, एक पोस्ट लिहीली तर आम्ही ऐकून घेणार नाही. आमच्याविरोधात बोललात तर जेलमध्ये टाकू ही अवस्था काही काळ आपल्याला पाहायला मिळाली. पण लोकशाहीमध्ये दुसरा आवाज आहे तो ऐकून घेतला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धीकी आणि धीरज देशमुखही उशिरा पोहोचल्याने सभागृहाच्या बाहेर

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धीकी आणि धीरज देशमुखही उशिरा पोहोचल्याने सभागृहाच्या बाहेर, उशीरा आल्याने मतदानात सहभाग नाही

Maharashtra Assembly session Floor Test Live Updates : काँग्रेस नेत्यांची मतदानाला गैरहजेरी

काँग्रेस नेत्यांची मतदानाला गैरहजेरी, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार उशीरा पोहोचल्याने मतदानात भाग घेऊ शकले, काँग्रेसचे आणखी तीन आमदार गैरहजर असल्याने एकूण पाच आमदार सभागृहात गैरहजर, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार लाॅबीमध्ये थांबुन, तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ही उशीरा पोहोचल्याने मतदानास गैरहजर

Maharashtra Assembly session Floor Test Live Updates : विधानसभेत बहुमत चाचणीचं मतदान सुरु, शिरगणतीवेळी संतोष बांगर यांचं नाव आल्यावर सभागृहात गोंधळ

बहुमत चाचणीचं मतदान सुरु, शिरगणतीवेळी संतोष बांगर यांचं नाव आल्यावर सभागृहात गोंधळ

आशिष शेलार , योगेश सागर , संजय शिरसाट , संग्राम थोपटे आणि चेतन तुपे तालिका अध्यक्ष,  विधानसभा अध्यक्षांकडून घोषणा
आशिष शेलार , योगेश सागर , संजय शिरसाट , संग्राम थोपटे आणि चेतन तुपे तालिका अध्यक्ष,  विधानसभा अध्यक्षांकडून घोषणा
शिंदे सरकारची बहुमत चाचणी; विश्वासदर्शक ठरावासाठी थोड्याच वेळात मतदान

भाजपच्या आमदारांना व्हीप बजावला, एकनाथ शिंदे यांना मतदान करण्याचे आदेश

भाजपच्या आमदारांना व्हीप बजावला, एकनाथ शिंदे यांना मतदान करण्याचे आदेश

Pravin Darekar LIVE : कालची परीक्षा उत्तम पद्धतीने परीक्षा पास झालो, अशाच प्रकारचं बहुमत आम्हाला मिळणार - प्रवीण दरेकर

Pravin Darekar LIVE : कालची परीक्षा आम्ही पास झालो आहे. उत्तम पद्धतीने परीक्षा पास झालो आहे. अशाच प्रकारचं बहुमत आम्हाला मिळणार आहे. आमची 164 मते होती 2 मते आमदारांच्या प्रकृती अस्वास्थामुळे मिळू शकली नाही, प्रवीण दरेकर

विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय आज उघडलं, ओळखपत्र पाहिल्याशिवाय कार्यालयात प्रवेश नाही

विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय आज उघडण्यात आलं, आमदार अजय चौधरी कार्यालयात उपस्थित, ओळखपत्र पाहिल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जात नाही, एकनाथ शिंदे गटाचे आमदार यांनी ताबा घेऊ नये, यासाठी शिवसेनेची सावध भूमिका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

थोड्याच वेळात विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, विधानसभा विरोधी पक्षनेतेच्या नावावर होणार शिक्कामोर्तब, आज सभागृहात होणार विरोधी पक्षनेत्याची घोषणा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी आमदार निलेश लंके आजारपणामुळं होते गैरहजर,  बहुमत चाचणीला उपस्थित राहणार
अहमदनगर-विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी आमदार निलेश लंके गैरहजर,आजारपणामुळं होते गैरहजर,  बहुमत चाचणीला उपस्थित राहणार , आमदार लंके यांनी केलं स्पष्ट.

 
शिंदे-फडणवीस सरकारची आज कसोटीचा; बहुमत चाचणी होणार

Maharashtra Politics : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.


शिंदे-फडणवीस सरकारची आज कसोटी


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज परीक्षा आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाईत तर जिंकली आहे. आता उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांची खरी परीक्षा आहे. 


आमदारांना मार्गदर्शन


आज होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी भाजप शिंदे यांच्याकडून आपापल्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं असून आजसाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे. शिवसेना आणि भाजप सरकारकडे बहुमत असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल हे सांगता येत नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. बहुमत असले तरी आपल्याकडील सर्व आमदारांना आपल्या बाजूने मत करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान शिवसेनेने आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना ३९ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.


शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम
विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. 









दरम्यान, शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे. तसा आशयाचं एक पत्र विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटनेतेपदी कायम ठेवण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.