एक्स्प्लोर
महापरिनिर्वाण दिन : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
समता सैनिक दलाने पथसंचलंन करुन मध्यरात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. तर, समता सैनिक दलाचे साडे पाच हजाराहून जास्त स्वयंसेवक, तसंच पोलीस इथे तैनात आहेत.
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथे अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दाखल झाले आहेत. समता सैनिक दलाने पथसंचलंन करुन मध्यरात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. तर, समता सैनिक दलाचे साडे पाच हजाराहून जास्त स्वयंसेवक, तसंच पोलीस इथे तैनात आहेत.
दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.
लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायींच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने अनेक सुविधा पुरवल्या आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी आदल्या दिवशीच मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना वास्तव्याची आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिकेच्या सात शाळांमध्येही त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत.
कोणकोणत्या सोयीसुविधा?
• चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे शामियाना आणि व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
• चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ आणि सूर्यवंशी सभागृह मार्ग या 3 ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा.
• 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
• शिवाजी पार्क मैदान आणि परिसरात 18 फिरती शौचालये (180 शौचकुपे).
• रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी 4 फिरती शौचालये (40 शौचकुपे).
• 380 पिण्यााच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
• पिण्याच्या पाण्यााचे 16 टँकर्स.
• संपूर्ण परिसरात विद्युत व्यपवस्थाच.
• अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
• चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्यावस्थां.
• मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
• 469 स्टॉल्सची रचना.
• दादर (पश्चिम) रेल्वेर स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/माहिती कक्ष.
• राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
• स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कूंच्या निवासाची व्यवस्था.
• मैदानात धुळीचा त्रास रोखण्याथसाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था.
• अनुयायांना मार्गदर्शनाकरीता 100 फूट उंचीचे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसर इथे निदर्शकाची व्यवस्था
• मोबाईल फोन चार्जिंगसाठी शिवाजी पार्क इथे 300 पॉईंट्सची व्यवस्था.
• फायबरच्या 200 तात्पुरत्या स्नानगृहाची आणि 60 तात्पुयरत्या शौचालयांची व्यवस्था
• इंदू मिलमागे फायबरच्या तात्पुरत्या 60 शौचालयांची आणि 60 स्नानगृहांची व्यवस्था.
• रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेल्यात 150 बाकड्यांची व्यवस्था.
• शिवाजी पार्कव्यातिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेही तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालये.
• स्नानगृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
पोलीस यंत्रणा सज्ज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी शिवाजी पार्क इथे येत आहेत. यासाठी मोठी गर्दी पाहता पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 2000 पोलीस सर्व ठिकाणी तैनात आहेत. येणाऱ्या अनुयायींसाठी योग्य सुविधा पुरवली जाणार आहे. तसंच मदत लागली तर पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
करमणूक
परभणी
जळगाव
Advertisement