कल्याण-डोंबिवली : ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेनेही 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केडीएमसीमध्ये 2 जुलै सकाळी सात वाजल्यापासून 12 जुलै सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन करणं गरजेचं असल्याचं मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवशी यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं.


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनबाबत महापालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.


ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काय सुरु, काय बंद?


1) अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.


2) इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी दिली जाणार नाही .


3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी असेल. या आदेशाअंतर्गत चालकाशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.


4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटरकडून कामकाज बंद असेल. तर बाहेरुन येऊन बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.


5) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.


6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील.


7) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.


8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल. डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.


9) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची आहे.


10) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने आस्थापनांना वरील प्रतिबंधामधून वगळण्यात येत आहे. बँका एटीएम विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयटीईएस टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.