एक्स्प्लोर

LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी

मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळात आणखी काय घडामोडी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मुंबई : 'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचं चित्र आहे. कारण विरोधकांनी मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने, कोणत्याही चर्चेशिवाय मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे. LIVE UPDATES * मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी * आता विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी जाणार * कायदा लागू होण्यासाठी आणखी एक टप्पा पार मराठा आरक्षण विधेयक विधानपरिषदेतही एकमताने मंजूर * विधानपरिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकापचा मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा* * कुठल्याही चर्चेविना मराठा आरक्षण विधेयक मंजूर होणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय * ओबीसींना धक्का लावला नाही यावर विश्वास नाही, ओबीसींची फसवणूक केली तर गप्प बसणार नाही : ओबीसी नेते LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी *एकमेकांना लाडू-पेढे भरवून भाजप आमदारांचं सेलिब्रेशन LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी * मराठा आरक्षणावर विरोधकही सेलिब्रेशन कलणार, विधेयक मंजूर झाल्यावर गुलाल उधळणार, फटाके आणि बँडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती * मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो, जय भवानी जय शिवाजी, विधानभवानाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाच्या तरतुदी - मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या 16 टक्के आरक्षण - राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या 16 टक्के LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत सादर केला. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करणारा अहवाल दिल्यानंतर, त्यावर सरकारने केलेल्या कृती अहवाल कायद्याच्या प्रतीसोबत मांडण्यात आला आहे. LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी *बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडल्याचं वृत्त चुकीचं : पंकजा मुंडे LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरीमी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. मराठा समाजाच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मी नाही. मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्यावेळी मी पुढे होते. चुकीची बातमी दाखवू नये ही विनंती. मी त्या बैठकीत गेले नव्हते. बैठक ज्या हॉलमध्ये होती तिथे इतर सदस्यही होते. बैठक सुरु झाल्यावर मी बाहेर गेले कारण मी सदस्य नाही. आरक्षणावर सरकार योग्य निर्णय घेणारच, ओबीसीला धक्का लागणार नाही." * मराठा आरक्षण विधेयक मंत्रिमंडळासमोर जाणार नाही. मंत्रिमंडळ उपसमितीला जीआरद्वारे सर्व अधिकार दिल्यामुळे विधेयक मंत्रिमंडळापुढे जाण्याची गरज नाही. या समितीत विधेयक मंजूर झाल्यामुळे विधेयक कॅबिनेट पुढे न जाता आता सदनात मांडले जाणार *पंकजा मुंडेंनी मंत्रिमंडळ उपसमितीत कोणता मुद्दा मांडला? कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतं आहे. आता कुणबी वगळून मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावे. मागास आयोगाने सर्वेक्षण करताना मराठा आणि कुणबी समाजाचं एकत्र सर्वेक्षण केले असेल तर आरक्षणाची टक्केवारी ठरवताना कुणबी समाजाला विचारात घेतलं जाणार आहे का याबाबत स्पष्टता यावी, असा मुद्दा पंकजा मुंडेंनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदस्य नसतानाही मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे घुसल्या आणि काही वेळाने त्या बाहेरही आल्या. यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. * पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नाराज होऊन पंकजा मुंडेंनी थेट मुख्यमंत्री कार्यालय गाठलं आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सदस्य नसतानाही पंकजा मुंडेंनी या बैठकीला हजेरी लावली. मात्र यानंतर काही वेळात त्या बाहेर आल्या. यानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढली. * ...तर अधिवेशन वाढवू : चंद्रकांत पाटील LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी "मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आज सभागृहात मांडणार आहोत, अधिवेशन संपण्याआधी विधेयक मांडू आणि कायदा आणू, वेळ पुरला नाही तर अधिवेशन वाढवू, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. तसंच तुमच्याकडूनच आम्ही राजकारण शिकलो आहोत," असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला. * सरकार लपवाछपवी का करत आहे? : अजित पवार LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी "आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका घ्यावी. मराठा आरक्षणाबाबत सरकार लपवाछपवी का करत आहे? मंत्रिमंडळ उपसमितीच्या सहा बैठका  झाल्या. लोकप्रतिनिधी, जनतेला अंधारात  का ठेवाता? मराठा आरक्षण विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा आहे. सरकार स्पष्टता नसताना जल्लोष करायला  निघाले आहेत. व्हॉट्सअॅपला मेसेज फिरत आहेत, जल्लोष करा, बॅनर लावा. 58 मोर्चे निघाले, अहो कसले श्रेय घेता?" असे प्रश्न अजित पवार यांनी सरकारला विचारले. तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असंही ते म्हणाले. * ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास त्याचं स्वागत करु, अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली. LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपली पंकजा मुंडे मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्य नसतानाही बैठकीला हजर, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडून पंकजा मुंडेंना समजवण्याचा प्रयत्न विधानभवनात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात, मराठा अरक्षणासंदर्भात निर्णायक बैठक ठरणार, या बैठकीनंतर एटीआर सभागृहात मांडणार विधेयक मांडा, सर्व पक्ष पाठिंबा देतील : जयंत पाटील आम्ही अहवाल मांडण्याची मागणी केली, परंतु सरकारने ती टाळली. आग्रहामुळे आज शिफारशी आणि एटीआर सादर करणार आहेत. सरकारने सगळे सोपस्कार सोडून विधेयक मांडावं, सर्व पक्ष पाठिंबा देतील, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं. 'अन्न गुडगुडे, नाड गुडगुडे, भाजप सरकार धिशक्यांव, धिशक्यांव, धिशक्यांव...' विरोधकांची विधानभवनाबाहेर घोषणा LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी * मुस्लीम आरक्षणासाठी विरोधी आमदारांची घोषणाबाजी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मुस्लीम आरक्षणासाठी विरोधी आमदार आक्रमक, मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षण मिळालं पाहिजे, अशी घोषणाबाजी आमदार विधानभवनाबहेर करत आहेत. * भाजप आमदार भगवे फेटे बांधून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी आज भाजपने मराठा आरक्षणाच्या जल्लोषाची तयारी जशी राज्यभरात केली, तशीच विधानभवनातही केली आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच भाजपचे सर्व आमदार भगवे फेटे परिधान करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. विधानभवन परिसरात जल्लोष फेरी काढणार आणि मिठाई वाटणार आहे. यावरुन भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं पूर्ण श्रेय घेण्याच्या तयारीला जोमाने लागल्याचं दिसत आहे.
* जुन्या आरक्षणाचा लाभ मिळालेल्यांना दिलासा मिळणार
ऱ्यांनाआघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण अध्यादेशानुसार ज्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा फायदा मिळाला होता, परंतु कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली, त्यांनाही आरक्षणाचा लाभ होणार असल्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात आहे. सूत्रांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
* जल्लोष साजरा केला जाईल : विनोद तावडे "मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आज दुपारी 12 वाजता सभागृहात मांडला जाईल. त्यानंतर आरक्षणाचं विधेयक सादर केलं जाईल. आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर उरलेल्या गोष्टी पूर्ण केल्या जातील. त्यानंतर जल्लोष केला जाईल," असं विनोद तावडे यांनी सांगितलं. * विधेयक मांडण्यास अडचण नाही : गिरीष बापट LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसला तरी Corrigendum काढून विधेयक सभागृहात मांडू शकतो. त्यानंतर विधेयकावर चर्चा होऊ शकते. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं गिरीष बापट यांनी सांगितलं. आज आधी एटीआर मांडू, विधेयक मांडण्यास अडचण नसल्याचं बापट म्हणाले. *सभागृहात आज केवळ एटीआर, विधेयकाचा उल्लेख नाही! LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी विधानसभेत आज फक्त मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आज सादर होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री एटीआर सादर करण्याबाबतचाच उल्लेख आहे. मात्र विधेयकाचा यात उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विधेयक सरकार ऐन वेळेला आणणार की चर्चा टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी आणणार? हे पाहावं लागेल. * मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी भाजपची तयारी LIVE UPDATE : मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्ष कार्यालय आणि प्रमुख चौकांत मुख्यमंत्री आणि सरकारचे अभिनंदनाचे बॅनर्स लावण्याचा आदेश पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आला आहे. पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर मराठा आरक्षणाचं विधेयक पारित झाल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जल्लोष करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ----------------- मुंबई : मराठा आरक्षणाचा कृती अहवाल आणि विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर मांडण्यात येणार आहे. काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपल्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी ही माहिती दिली आहे. आज सकाळी साडे दहा वाजता पुन्हा एकदा उपसमितीची बैठक होणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आरक्षणाचा कृती अहवाल सभागृहात मांडला जाईल. तर संध्याकाळपर्यंत विधेयक सभागृहात मांडलं जाईल. मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळात आणखी काय घडामोडी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मराठा समाजाला किती आरक्षण? मराठा समाजाला 12 टक्के, 14 टक्के की 16 टक्के आरक्षण द्यायचं यावर काल (28 नोव्हेंबर) मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामुळे किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबत आज निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची ही पाचवी बैठक होती. आज उपसमितीची सहावी बैठक पार पडेल. विरोधकांची सरकारविरोधात हक्कभंगाची सूचना हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण अहवालासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी विरोधकांनी सरकारविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विधानपरिषदेत मांडली आहे. यावर विधानपरिषद सभापतींनी सूचना तपासून पाहून मंत्र्यांकडून रिप्लाय मागवून घेऊ असे सांगितले आहे. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्तावाबाबत सूचना सादर केली आहे. याआधीच रणपिसेंनी हक्कभंगाची नोटीस विधानपरिषदेच्या सभापतींना पाठवली होती. शिवाय सरकारकडून मराठा अहवाल सभागृहापासून लपवला जात असल्याचा आरोप रणपिसेंनी केला आहे. विरोधक आणि सरकार दोघांनाही मराठा आरक्षण हवं आहे. कृती अहवाल आणि विधेयक एकत्र आणलं तर विरोधकांना विरोध करण्यासाठी जागाच राहणार नाही. आजचा दिवस सोडल्यास हिवाळी अधिवेशनाचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी वेळच नसल्यामुळे विधेयक मंजूर करुन घेणं ही सत्ताधारी आणि विरोधकांचीही जबाबादारी आहे. शिवाय विधेयकाला विरोध केल्यास जनमत विरोधात जाण्याची भीती विरोधकांना आहे. विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री आमदारांना व्हीप जारी दुसरीकडे सभागृहात दगाफटका टाळण्यासाठी भाजप, शिवसेनेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसन आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला आहे. हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे महत्त्वाचे तीन दिवस शिल्लक आहेत. या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा कृती अहवाल, विधेयक सादर करुन ते मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे महत्त्वाचं कामकाज आणि विधेयक पाहता आमदांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचं विधेयकाला पाठिंबा देण्याचं आश्वासन : पाटील दरम्यान, आरक्षणासंदर्भात शिवेसेनेच्या पाठिंब्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 27 नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनीही विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. अहवालासाठी विरोधक आग्रही दुसरीकडे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करावा, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. मात्र कलम 14 आणि 15 चा दाखला देत राज्य सरकार नियमानेच कार्यवाही करत असून विधेयक मांडण्याआधी एटीआर मांडण्यात येईल, जो कायद्यानुसार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाला बाधा नाही : मुख्यमंत्री "तसंच ओबीसी समाजाच्या 52 टक्के आरक्षणाला बाधा न आणता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे. राज्यात सध्या 52 टक्के आरक्षण आहे, 50 टक्के नाही. एसईबीसीचं आरक्षण जिवंत आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं. संबंधित बातम्या मराठा समाजाला किती टक्के आरक्षण? उद्या निर्णय मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत; भाजप, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget