Mumbai News : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलं असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे. 2019 साली काही उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र त्यांना महामंडळानं अद्यापही नियुक्ती दिली नाही. अशातच या 1800 आंदोलकांकडून त्वरीत कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. त्याचसाठी या प्रशिक्षणार्थ्यांकडून आज आंदोलन केलं जात आहे.


एसटी महामंडळाकडून 2019 ला प्रक्रिया पूर्ण करुनही प्रशिक्षणार्थ्यांना भरती करण्यात आलं होतं. मात्र तरिही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. 1800 प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून कामावर घेण्याची मागणी केली जात आहे. या आंदोलकांमध्ये चालक, वाहक, सहाय्यक, टेक्निशियन्सचा समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रेतील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठिकठिकाणी प्रशिक्षणार्थी आंदोलकांकडून मोर्चाची तयारी करण्यात आली असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  


एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही? दोन दिवसांत अहवाल!


एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप अजूनही संपलेला नाही. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये  विलनीकरण करायचं की नाही यासंदर्भातला अहवाल दोन दिवसांत येणार आहे.. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनीच तशी माहिती दिली आहे.. मालेगावमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं अनिल परबांनी स्पष्ट केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha