Air Quality Index in Mumbai : मुंबईत सातत्यानं हवा गुणवत्ता निर्देशांक खाली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचं चित्र आहे. मुंबईत सततचा हवा गुणवत्ता निर्देशांक खालावण्याचं कारण वातावरणीय बदल आहे का? असा प्रश्न आता अनेक शास्त्रज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम भारतातील हवा गुणवत्ता मागील तीन ते चार महिन्यांत असामान्य स्थिती बघायला मिळत आहे. प्रामुख्यानं हिवाळ्यात मुंबईसारख्या समुद्र किनारी वसलेल्या शहरालगत असे मोठेबदल आपल्याला अपेक्षित नसतात. मात्र वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलत असल्यानं मुंबईतील हवा गुणवत्ता खालावत असल्याचं चित्र आहे.
मागील दोन आठवड्यांपूर्वी धुळीच्या वादळामुळे मुंबईसोबतच पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील हवा गुणवत्ता खालवली होती. मोठ्या प्रमाणात त्यात पीएम 10 आणि पीएम 2.5 हे घटक आढळून येत होतं. अशातच आता देखील पुन्हा एकदा दुसऱ्यांदा थार वाळवंटात धुळीच्या वादळाची निर्मिती झाल्यानं ते गुजरातकडे येत आहे. कालांतरानं मुंबईसोबतच महाराष्ट्राला देखील त्याचा फटका बसतोय.
हिवाळा आणि थंडीची परिस्थिती असल्यानं, सोबतच पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे एक ट्रफ तयार होत आहे आणि त्यामुळे हे धुळीचं वादळ गुजरात आणि मुंबईच्या वातावरणात बघायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरांमधील दृश्यमानता कमी झाली आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबईकरांची चिंता वाढली; मुंबईची हवा पुन्हा एकदा बिघडली
4 फेब्रुवारीपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील एअर क्वॉलिटी अति खराब श्रेणीत गेली होती. आज देखील एअर क्वॉलिटी अति खराब स्थितीत असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र 8 फेब्रुवारीपासून हवेची गुणवत्ता सुधारणार असल्याचं आयआयटीम अंतर्गत येणाऱ्या सफर संस्थेचे प्रकल्प संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी सांगितलं आहे.
डॉ. बेग यांच्या सांगण्यानुसार, "हिवाळ्यात साधारण अशी परिस्थिती बघायला मिळत नसते. एअर क्वॉलिटी मुंबई आणि आजूबाजूच्यापरिसरातील सर्वसाधारण मध्यम श्रेणीत असते राहात असते, मात्र आता ती 'अतिशय वाईट' श्रेणीत असल्याचं दिसत आहे. सातत्यानं मुंबईतील हवा प्रदूषित होत असल्यानं शास्त्रज्ञांकडून मुंबईतील हिवाळ्यातील वातावरणीय बदलांसंदर्भात अभ्यास सुरु करण्यात आला आहे."
एक्सट्रीम प्रदूषण इव्हेंट्स, हिवाळ्यात येत असलेले हे धुळीच्या कणांचे वादळ म्हणजे, असामान्य परिस्थिती आहे. त्यामुळे क्लायमेटचेंजचा हा प्रभाव असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे.
मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक आता 314 वर गेला असून माझगावमध्ये 495, कुलाबात 302, मालाडमध्ये 361 वर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Baramati Agriculture News : होमिओपॅथिक शेती, कधी ऐकलंय का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील पहिला प्रयोग
- Ahmednagar : भाज्यांचे दर कडाडले; बदलत्या हवामानामुळे आवक घटल्याने दरांमध्ये वाढ
- डाळिंब बागा वाचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha