पुणे:  पुण्यातील (Pune News)  ससून रुग्णालयातून  (Sasoon Hospital Drug Racket)   पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil Arrested) अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ललित पाटीलला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. 


ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी जंग - जंग पछाडून ललित पाटील  15 दिवसानंतर अखेर हाती लागला आहे. आपल्या ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील कर्नाटक येथे लपला होता. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पोलिसांच्या नाकाखालून पळून गेला होता.  पुणे पोलिसांबरोबर  मुंबई पोलिस देखील त्याच्या मागावर होते. मुंबई पोलिसांच्या टीम ललिल पाटीलच्या मागावर होत्या. 


आज मुंबईला आणण्याची शक्यता


ललित पाटील 2 ऑक्टोबरल रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी हे कारवाई केली होते. साकीनाका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होते. ललित पाटील पुण्यातून, गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला. कर्नाटकातून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती माहिती मिळाली.  ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता आहे.


कशी केली अटक?


काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर ललीत पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असताना साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत  तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली.


काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर ललीत पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असताना साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत  तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. त्यांच्याकडे दाखल असलेल्या केसमधील एक अटक आरोपीला ललितने नव्या फोन नंबर वरून फोन केला. याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले. एक ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि आणि त्याचे दोन सहकारी आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरला पोहचला. या  सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर  एक हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा:


Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलले, नेमकं काय आहे ठोस कारण?