Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates:  अरबी समुद्रात लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न, बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates: पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरातंsss आज लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 18 Sep 2024 10:41 AM
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न, बाप्पा गावाला गेले

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावरुन समुद्रात उतरला, विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2024: लालबागचा राजा यांत्रिक तराफ्यावरुन समुद्रात उतरवण्यात आला. लालबागचा राजा हळूहळू पाण्याखाली जाताना भाविक डोळे भरुन त्याचे रुप डोळ्यात साठवत होते.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसून खोल समुद्राकडे मार्गस्थ

Lalbaugcha Raja Visarjan 2024 Aarti at girgaon chowpatty VIDEO

Lalbaugcha Raja Visarjan 2024: अनंतशेठ अंबानी पाचव्यांदा लालबागचा राजाच्या दर्शनाला, गणपती बाप्पााकडे काय मागितलं? अखेर सांगूनच टाकलं

मुंबई :  नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja)  आणि अंबानी कुंटुंबाचे  खास नाते आहे. दरवर्षी संपूर्ण अंबानी कुटुंब न चुकता गेली अनेक वर्षे राजाच्या दर्शनसाठी येतात. यंदा तर   रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani)  यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानींनी गणपती बाप्पाकडे काय मागितलं?

Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही

Mumbai News: लालबागचा राजा 22 तासांची मिरवणूक पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. लालबागचा राजाच्या विसर्जनाची गिरगाव चौपाटीवरील विहंगम दृश्य. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसला; चहुबाजूंना जनसागर, बाप्पा निघाला गावाला
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा तराफ्यावर बसला, चहुबाजूंना गर्दीच गर्दी

Mumbai Ganesh: लालबागचा राजा आता विसर्जनासाठी तराफ्यावर नेण्यात आला आहे. राजाला वाद्यांची शेवटची सलामी दिली जात आहे. थोड्याचवेळात लालबागचा राजा विसर्जनासाठी खोल समुद्रात नेला जाईल.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जनासाठी तराफ्यावर बसला

Mumbai Ganesh Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जनसाठी तराफ्यावर बसवण्यात आला आहे. आता हा तराफा खोल समुद्रात नेला जाईल. तराफ्यावर ५ स्कुबा डायव्हर्स आहेत. ज्यांच्या माध्यमातून हायड्राॅलिक क्रेनच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही, अलोट जनसागर, लालबागचा राजाच्या आरतीने वातावरण भारलं

तब्बल 22 तासांपासून सुरु असलेली बाप्पाची मिरवणूक आत्ता गिरगाव चौपाटीवर येऊन दाखल झाली आहे. यावेळी लालबागच्या राजाची शेवटची आरती भक्तांकडून करण्यात आली. सविस्तर वाचा.




 


Lalbaugcha Raja Visarjan 2024: गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाची आरती संपन्न

गिरगाव चौपाटीवर विसर्जनापूर्वी लालबागचा राजाची आरती संपन्न झाली. यावेळी गिरगाव चौपाटीवर अलोट जनसागर जमला होता. लालबागचा राजाची आरती सुरु असताना गिरगाव चौपाटीवरील वातावरण अक्षरश: भारले होते.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल

मुंबई: जगातील तमाम गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला लालबागचा राजाची मिरवणूक तब्बल 19 तासांनी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाली आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Visarjan 2024) रविवारी सकाळी साधारण 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो. यंदा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हे अंतर पार करण्यास तब्बल 20 तास लागले. सविस्तर वाचा

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

Ganesh Visrajn 2024 in Mumbai: गिरगाव चौपाटीवर मुसळधार पावसात भाविकांची गर्दी

गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. भर पावसात गणेश भक्तांकडून जल्लोषात बाप्पाचा विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या अनेक गणपतींचे विसर्जन अद्याप बाकी आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजाच्या दर्शनसाठी मुंबईकरांची गर्दी

Ganesh Visrajn 2024 in Mumbai: गणपती विसर्जनानंतर अमृता फडणवीस समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणार

Mumbai News: गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या वतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. सकाळी 6.30 वाजता वर्सोवा किनारपट्टी स्वच्छ केली जाणार आहे. यावेळी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर  उपस्थित राहतील.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाला आहे. तब्बल 19 तासांनी लालबागचा राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. थोड्याचवेळात विसर्जन होणार.

Lalbaugcha Raja Visarjan LIVE 2024: लालबागचा राजा भायखळा फायर ब्रिगेड जवळ, जवानांकडून गाडीचा सायरन वाजून सलामी

लालबागचा राजा भायखळा फायर ब्रिगेड जवळ आला असून भायखळा अग्निशमन दलाचा जवानांकडून गाडीचा सायरन वाजून आणि गाडीची लाईट चालू करून लालबागचा राजाला सलामी दिली जात आहे. यावेळी गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे.


 

लालबागच्या राजाला भायखळा फायर ब्रिगेड देणार सलामी

लालबागचा राजा भायखळा फायर ब्रिगेड जवळ येणार आहे. राजाला फायर ब्रिगेडच्या गाड्या सलामी देणार आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत लालबागचा राजा भायखळा फायर ब्रिगेडजवळ येण्याची शक्यता आहे.

Lalbaugcha Raja Visarjan LIVE 2024: श्राॅफ बिल्डिंगच्या चौकात लालबागचा राजावर फुलांची उधळण

श्राॅफ बिल्डिंगच्या चौकात लालबागचा राजाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या ठिकाणी लालबागच्या राजावर फुलांची उधळण करण्यात आली आहे.

Lalbaugcha Raja Visarjan LIVE 2024: लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Lalbaugcha Raja Visarjan LIVE 2024: लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय. थोड्याच वेळात पारंपरिक कोळी नृत्य आणि कोंबडी बाजानं राजाला सलामी दिली जाणार आहे. 

मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती

मुंबईचा राजा आणि काही मोजके गणपती विसर्जनासाठी तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात नेले जातात. मात्र, अन्य मंडळांचे कार्यकर्ते गणपतीची मूर्ती उचलून विसर्जनासाठी समुद्रात नेतात. समुद्रात मोठी भरती आल्यास विसर्जन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे रात्री 11 पूर्वी गणेशमूर्तीचे विसर्जन करु शकतात. खेतवाडीच्या राजाचे विसर्जनही यंदा लवकर होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ



Lalbaugcha Raja Immersion LIVE: अकरा दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार

Lalbaugcha Raja Immersion Mumbai LIVE: लालबागच्या राजाची  विसर्जन मिरवणूक आज सकाळी 11 वाजता लालबाग मार्केटमधून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. अनंत चतुर्थी निमित्त आज सकाळी 9.30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा, आरती पार पडणार.


अनंत चतुर्थी निमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केटमधील सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून केवळ मीडिया प्रतिनिधी आणि रहिवाशांना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे. 

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk LIVE: सकाळी 9.30 वाजता आरती, त्यानंतर पारंपारिक कोळी नृत्य; कोंबडी बाजाच्या सुरांत लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk LIVE Updates : नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी 11 वाजता मार्गस्थ होणार आहे. त्यापूर्वी सकाळी 9.30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा, आरती पार पडेल. त्यानंतर पारंपरिक कोळी नृत्य पार पडेल. कोळी समाजाकडून लालबागच्या राजाला नैवेद्य दाखवला जाईल. त्यानंतर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. 

Lalbaugcha Raja Visarjan LIVE : आज अनंत चतुर्थदशी... अकरा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा आज निरोप घेणार

Lalbaugcha Raja Visarjan LIVE Updates : आज अनंत चतुर्थदशी... आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा अकरा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज निरोप घेणार आहे. आज गणराय आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. मुंबईतील लालबागमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. 

पार्श्वभूमी

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE Updates: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 9.30 च्या दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती (Lalbaugcha Raja Aarti) होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 च्या दरम्यान, लालबागचा राजा (Lalbaugcha Raja Pandal) मंडपातून बाहेर पडताना दिसेल. 


लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक (Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk) आज सकाळी 11 वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे.


अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी 9.30 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे. 


अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून केवळ मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आलं आहे.


लालबाग राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल


लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे.सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाला गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढली. भाविकांना धक्काबुक्की,मानगुटीला धरून बाजूला फेकणे,भाविकांसोबत हाडामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत. लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्ता कडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीचा संदर्भात काही व्हिडिओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलला जात असल्याचा आपण बघितला आहे. अजूनही तीच परिस्थिती लालबागचा मंडळात दिसून येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.