(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचं भरभरुन दान, मोजदाद सुरु
Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी भक्तांकडून भरभरुन दान. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही जमा.
Lalbaugcha Raja 2022 : गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या (Lalbaug News) राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणी माथा टेकवता येणार आहे. भक्तांनी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2022) दानपेटीत पहिल्याच दिवशी भरभरून दान केलं आहे. काल झालेल्या दानाची आज मोजदाद सुरु करण्यात आली आहे.
मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. त्याची मोजदाद आजपासून सुरु झाली. भक्तांनी रोख रकमेत मोठ्या प्रमाणात दान दिली आहे. जमा झालेल्या नोटांची मशिन्सद्वारे मोजणी करण्यात येत आहे. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत.
लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या आहेत. आज राजाला दान केलेल्या एका घराच्या प्रतिकृतीबरोबर पाठवलेल्या चिठ्ठीत घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानं घराची प्रतिकृती अर्पण करत असल्याचं नमूद केलं आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत राजाच्या भक्तांकडून येणाऱ्या या दानाची मोजदाद रोज सुरु राहणार आहे.
पाहा व्हिडीओ : लालबागच्या राजाला मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु
दरम्यान, गणेशोत्सवात अवघ्या देशाच्या नजरा जिथं असतात त्या लालबागमध्ये यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. लालबागचा (Lalbaug) गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजाच्या मंडळानं दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन केलं आहे. लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळानं राममंदिराचा देखावा उभारला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :