मुंबई : ओझोन थेरपीसाठी प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक डॉक्टर रमेश शाह यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 'कोरोनाश' हे एक नवं अस्त्र तयार केलं आहे. हे अस्त्र म्हणजे एक अल्ट्रा व्हॉयलेट अर्थात यूव्ही-सी लाईट उत्सर्जित करणारी एक टॉर्च आहे. या टॉर्चचा वापर करून कुठल्याही पृष्ठभागावरील कोरोनासह अन्य अपायकारक किटाणू नष्ट करता येतात. तसेच मानवी शरीरावरही याचा यशस्वीपणे वापर करण्यात आल्याचं ही टॉर्च तयार करणारे डॉ. रमेश शाह यांनी सांगितलं आहे.


कोरोनाचा मुकाबला करण्यात दक्षिण कोरिया, जपान आणि चीनमध्ये प्रभावी ठरलेल्या यूव्ही-सी या किरणांचा वापर महाराष्ट्रातही करावा अशी विनंती माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सॅनिटायझरचा वाढता वापर आपण यूव्ही लाईटच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना भविष्याच्या दृष्टिने प्रशासनानं या नव्या पर्यायांचा आत्तापासून विचार करायला हवा, असं मत डॉ. दिपक सावंत यांनी म्हटलं आहे.


मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू


बाजारात सध्या अनेक प्रकारच्या यूव्ही लाईट उपलब्ध आहेत. मात्र ओझोन थेरीपीच्या दृष्टीने उपयोगात आणण्यासाठी 'कोरोनाश'ची खास निर्मिती करण्यात आली आहे. याचं व्यावसायीकरण करण्याचा डॉ. रमेश शाह यांचा कोणताही विचार नाही. मात्र ही प्रणाली अधिक विकसित करून ती लवकरात लवकर सर्वसामन्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी सरकारनं सकारात्मक पावलं उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


इतर बातम्या




Remdesivir Medicine | रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरण एका मोठ्या हॉस्पिटलशी जोडलेलं- राजेंद्र शिंगणे