मुंबई : कानपूर पोलीस हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी विकास दुबेचा निकटवर्ती अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन त्रिवेदी याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईला लागून असलेल्या ठाण्याच्या कोलशेत परिसरातून अटक केली. गुड्डन ठाण्यात त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी लपला होता. अटकेनंतर गुड्डनने पोलिसांना सांगितले की, खून झाल्यानंतर तो एक रात्र कानपूर येथील त्याच्या ड्राइव्हरच्या घरात लपला होता आणि दुसर्या दिवशी त्याच्या चालकासह तो मध्य प्रदेशातील दतिया येथे पसार झाला. या दोघांनी आपली गाडी दतियामध्ये सोडली. मग तेथून ते एका ट्रकमधून महाराष्ट्रातील पुण्यात आले आणि पुण्याहून दुसर्या ट्रकमध्ये गुड्डन व त्याचा चालक सुशील तिवारी ठाण्यातील आपल्या गावकरीच्या घरी आले.
गुड्डन ठाण्यातील आपल्या गावकऱ्याला जबरदस्तीने धमकावून चार दिवस त्यांच्या घरात राहिला. दरम्यान, शुक्रवारी रात्री महाराष्ट्र एटीएसच्या टीममधील दया नायक यांना ठाणे येथे गुड्डन लपल्याची माहिती मिळाली आणि शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. एटीएसचे डीसीपी विक्रम देशमाने यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, 'खुनाच्या रात्रीपासून ते कानपूरहून मुंबईला आल्याची सर्व माहिती गुड्डनकडून घेतली जात आहे. या अटकेबद्दल आम्ही यूपी एसटीएफला कळवले आहे. एसटीएफच्या पथकाने उज्जैन सोडले आणि आम्ही ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही यूपी एसटीएफकडे देऊ.'
Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा
असं म्हटलं जात आहे की गुड्डन हा उत्तर प्रदेशातील जगनपूरचा जिल्हा पंचायत सदस्य आहे. घटनेनंतर गुड्डन फरार होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकासच्या घरी केलेल्या पोलिसांच्या हत्येतही तो सहभागी होता. विकास दुबेने पोलीस हत्याकांडाच्या दोन दिवस आधी कानपूरमधील रुरा शहरमधील बाजारपेठेतील त्याच्या दुकानाचे उद्घाटनही विकास दुबेने केलं होतं.
Vikas Dubey Arrested: कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमधून अटक
विकासबरोबर गुड्डन हा गुन्हेगारी प्रकरणात भागीदार होता. 2001 मध्ये राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येतही याचा समावेश होता. उत्तर प्रदेश सरकारनेही या बदमाशाच्या अटकेसाठी 50 हजारांचे बक्षिस ठेवलं आहे. अटकेनंतर एटीएसने यूपी एसटीएफला कळवले आहे. कानपूर चकमकीनंतर अखिलेश यादव यांच्यासोबतचा गुड्डनचा फोटोही व्हायरल होत होता.