एक्स्प्लोर
Advertisement
हिरानंदानी रुग्णालय किडनी रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल
मुंबई : पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपपत्र सादर केलं आहे. अंधेरी न्यायालयात एक हजार पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांसह चार जणांना पोलिसांनी पसार घोषित केलं आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतर, दोन्ही डॉक्टरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. किडनी रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या ब्रिजकिशोर जयस्वाल यांचा मृत्यू झाल्याचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सुरु असलेल्या किडनी रॅकेटचा जुलै महिन्यात पदार्फाश करण्यात आला होता. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. मुकेश शहा, डॉ. प्रकाशचंद्र शेट्टी, डॉ. कर्नल अनुराग नाईक यांच्यासह आरोपी भजेंद्र हिरालाल भिसेन, ब्रिजकिशोर जयस्वाल, त्याचा पुत्र किशन जयस्वाल, इक्बाल सिद्धीकी, भारतभूषण शर्मा, निलेश कांबळे, ख्वाजा पटेल, युसूफना दिवाण, शोभना दिनेशभाई ठाकूर उर्फ शोभादेवी यांना अटक केली होती.
पवई रुग्णालय किडनी रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जयस्वाल यांचा दरम्यानच्या काळात गुजरातमधील राहत्या घरी मृत्यू झाला होता. याच्या वैद्यकीय अहवालासोबतच अनेक पुरावे आरोपपत्रासोबत जोडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement