एक्स्प्लोर
'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती

मुंबई: 'दाऊद कॉल प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत असून पोलिस हॅकर्सच्या संपर्कात आहेत.' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं प्रीती मेमनं यांनी म्हटलं आहे. तसेच सध्याच्या लाचखोरी प्रकरणात निष्पक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आप नेत्या प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.
गेल्या काही दिवसांपासून गजानन पाटील लाचखोरी प्रकरणी खडसे अडचणीत सापडले आहेत. त्यातच दाऊद इब्राहिमच्या कॉल लिस्टमध्ये खडसेंचं नाव असल्याची बातमी गुजराती वृत्तपत्रानं छापली होती. याप्रकरणी प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकनाथ खडसे यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
