एक्स्प्लोर

महाआघाडीत येण्यासाठी MIM ला बाजूला ठेवा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आंबेडकरांना इशारा

महाआघाडीमध्ये सामील व्हायचे असल्यास भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमला बाजूल ठेवावे लागेल, असे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले आहेत.

मुंबई : 2019 च्या निवडणुकांआधी राज्यातल्या राजकीय घडीमोडींचा वेग वाढला आहे. भाजप विरोधातील महाआघाडीमध्ये सामील व्हायचे असल्यास भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमला बाजूल ठेवावे लागेल, असे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले आहेत. यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षांच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी येण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी करण्यात येत आहे मात्र त्यासाठी त्यांना एमआयएमची साथ सोडण्याची अट घालण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुक आता काही महिन्यांवर आल्याने महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थांबलेली बोलणी पुन्हा सुरु झाली आहे. महाआघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी देखील लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह आहे.

प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत सोबत घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी देखील प्रयत्न केले होते. प्रकाश आंबेडकरही काँग्रेससोबत जाण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली होती.

एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यातील 48 जागांचे वाटप झाले असून  महाआघाडीमध्ये येण्यासाठी आमच्याशी बोलणी करणे हा केवळ फार्स सुरु आहे, अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच आम्ही एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
Embed widget