एक्स्प्लोर

35 लाखांची लाच मागितली, केडीएमसीचे उपायुक्त रंगेहाथ अटक

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय घरत यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय घरत यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी 35 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 27 गावांमध्ये बेसुमार अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत. त्यावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 42 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 35 लाख रुपये देण्याचं ठरलं. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातल्या घरत यांच्या दालनात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घरत यांनी स्वीकारला. यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ अटक केली. घरत यांच्यासह केडीएमसीचे लिपिक ललित आमरे आणि लिपिक भूषण पाटील यांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या. यानंतर एसीबीने घरत यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्या गाड्या, घरं यांची तपासणी सुरु झाली आहे. तर त्यांच्या दालनात या लाचेच्या रकमेसह आणखी काही रक्कमही सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली दिली आहे. घरत यांच्यावरील या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. घरत यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या निलंबनाचा ठरावही महासभेनं केला होता. आता घरत यांना एसीबीने पकडल्यानंतर कल्याणमध्ये नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. तसंच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget