मुंबई: कमला मिल आगप्रकरणी अखेर मोजोज बिस्त्रो पबचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली. 14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कमला मिल आगप्रकरणी युग तुली प्रमुख आरोपींपैकी एक होता.

मात्र गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण तो अर्ज फेटाळल्यानंतर युग तुली गायब होता. अखेर त्याने काल रात्री ना म जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शरण आलेल्या युग तुलीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल.

कमला मिल्स आग : 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक

याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर अनधिकृत बांधकाम, अग्निशमनचे नियम धाब्यावर बसवण्यासह अनेक आरोप आहेत.

विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?

कमला मिल आगप्रकरणी कोणाकोणाला अटक?

  1. कृपेश संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)

  2. जिगर संघवी (हॉटेल वन अबव्ह) (10 जानेवारी रात्री)

  3. अभिजीत मानकर (हॉटेल वन अबव्ह) (11 जानेवारी सकाळी)

  4. विशाल कारिया (आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप) (9 जानेवारी सकाळी)

  5. युग पाठक (मोजोस बिस्त्रोचा दुसरा मालक)

  6. युग तुली (मोजोस बिस्त्रोचा मालक) (15 जानेवारी रात्री)

  7.  केविन केणी बावा (मॅनेजर, 'वन अबव्ह'- 1जानेवारी )

  8. लिसबन स्टेनील लोपेज (मॅनेजर, 'वन अबव्ह'- 1 जानेवारी )


कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरण

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास मोजोस पबला भीषण आग लागली होती. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

संबंधित बातम्या :

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'

कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त

कमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कार

कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक

कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा

मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे

अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू

कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस

बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार

अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई

1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान

हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील

कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!

कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...

कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू

मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ